Election : निवडणुकीत जप्त केलेले पैसे आणि दारूचे पुढे काय होते?

निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष दररोज कोट्यवधी रुपये वितरित करतात. त्यावेळी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, बेकायदेशीरपणे किंवा निवडणुकीदरम्यान नियमांविरुद्ध वापरलेली रोकड आणि दारू पोलिसांकडून जप्त केली जाते.

314
मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी (Election Commissioner) २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची (Election) घोषणा केली आहे. निवडणूक आयुक्तांनी त्यावेळी २०२२-२३ च्या निवडणुकांमध्ये ३ हजार ४०० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती दिली. असेच मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा साठाही जप्त केल्याचे सांगितले. मात्र हा जप्त केलेल्या पैशाचे आणि दारूचे पुढे काय होते, याविषयी सहसा कुणाला माहित नसते.

निवडणूक आयोगाकडून केली जाते कारवाई 

निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष दररोज कोट्यवधी रुपये वितरित करतात. त्यावेळी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, बेकायदेशीरपणे किंवा निवडणुकीदरम्यान नियमांविरुद्ध वापरलेली रोकड आणि दारू पोलिसांकडून जप्त केली जाते. निवडणुकीच्या (Election) काळात या कोट्यवधी रुपयांचे आणि जप्त केलेल्या दारूचे काय होते आणि कुठे जाते? असा प्रश्न अनेकांना पडतो. काळ्या पैशाचा सर्वाधिक वापर निवडणुकांमध्ये होतो. बहुतेक उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी आयोगाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा कितीतरी पट जास्त खर्च करतात. निवडणुकीच्या कामात काळा पैसा वापरला जातो ज्याचा कोणताही हिशोब दिला जात नाही. त्यामुळे विविध ठिकाणांहून पक्ष आणि उमेदवारांना मोठ्या प्रमाणात रोकड पोहोचवली जाते. यासाठी पोलीसही सज्ज झाले आहेत. ते संशयास्पद वाटणाऱ्या वाहनांची आणि लोकांची तपासणी आणि चौकशी करत असतात. याशिवाय पोलिसांना त्यांच्या सूत्रांकडून किंवा माहिती देणाऱ्यांकडूनही माहिती मिळते. मग ते छापा टाकून रोकड किंवा दारू जप्त करतात.

पैसे परत हवे असतील तर हिशेब द्यावा लागतो 

निवडणुकीच्या (Election) काळात पोलिसांकडून जी काही रोकड जप्त केली जाते ती आयकर विभागाकडे सोपवली जाते. पोलीस ज्या व्यक्तीकडून रोख रक्कम गोळा करतात ती नंतर त्यावर दावा करू शकते. हा पैसा स्वतःचा आहे आणि तो बेकायदेशीरपणे कमावला गेला नाही हे सिद्ध करण्यात ती व्यक्ती यशस्वी झाली आणि जर त्याने पुरावा म्हणून संपूर्ण माहिती सादर केली तर त्याला पैसे परत केले जातात. पुराव्यासाठी, तुमच्याकडे एटीएम व्यवहार, बँकेची पावती आणि पासबुकमधील नोंद असणे आवश्यक आहे. जप्त केलेल्या रकमेवर कोणी दावा केला नाही तर तो पैसा सरकारी तिजोरीत जमा होतो. निवडणुकीच्या (Election) काळात रोख रकमेशिवाय मोठ्या प्रमाणात दारूही जप्त केली जाते. मतदारांना आकर्षित करण्यासाठी दारूचा वापर केला जातो. या दारूची कायदेशीर वाहतूक होत असेल तर कारवाई केली जात नाही. मात्र कागदपत्रांशिवाय वाहतूक केल्यास ती दारू जप्त केली जाते. निवडणुकीदरम्यान सापडलेली सर्व दारू प्रथम एकाच ठिकाणी जमा केली जाते. नंतर ती एकत्रच नष्ट केली जाते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.