लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha Election) अवघा एक महिना उरला आहे. भाजपाने निवडणूक प्रचारात सर्व शक्ती पणाला लावली आहे. निवडणुकीपूर्वी भाजपाने आपली अधिकृत मोहीम ‘२०२४ द नमो मर्चेडाईज’ सुरु केली आहे. याअंतर्गत अनेक दैनंदिन वापराच्या वस्तू आहेत, ज्यावर मोदी सरकारचे समर्थन करणारी घोषवाक्ये लिहिलेली आहेत. ही सामग्री केवळ नमो ऍप किंवा नरेंद्र मोदी ऍपवर उपलब्ध आहे. (Lok Sabha Election)
(हेही वाचा – NPS Rule Updated : राष्ट्रीय पेन्शन योजनेत १ एप्रिलपासून होणार हा महत्त्वाचा बदल)
टी-शर्ट, कॉफीमग, टोपी आणि बिल्ला
भाजपाच्या द नमो मर्चेडाईज मोहिमे अंतर्गत टी-शर्ट, कॉफीमग, टोपी आणि बिल्ला यांसारख्या वस्तू सादर करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये ‘आता ४०० पार करा’, ‘फिर एक बार मोदी सरकार’, ‘मोदी है तो मुमकिन है’ अशा घोषणा आहेत. (Lok Sabha Election)
प्रचारात पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी गेल्या दशकात पूर्ण केलेल्या अनेक आश्वासनांच्या ट्रॅक रेकॉर्डवर आणि पक्ष आणि त्यांच्या समर्थकांच्या विश्वासावर भर दिला आहे. यातील सर्वात प्रमुख थीम म्हणजे मोदींचे कुटुंब, जे पंतप्रधान मोदींना त्याचे कुटुंब मानतात. अशा लाखो भारतीयांमध्ये व्हायरल वाक्य झाले आहे. (Lok Sabha Election)
आता या वस्तूंची देखील देशभर मोठी मागणी वाढत असल्याचे चित्र आहे. १८ एप्रिल पासून देशभरात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने निवडणूकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर भाजपाने आपला निवडणूक प्रचार जोरात सुरु केला आहे. (Lok Sabha Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community