Drug Racket : आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी रॅकेट DRI कडून उध्वस्त, १०० कोटींचे कोकेन जप्त

डीआरआय अधिकाऱ्यांनी नाट्यमय पाठलाग करून मुख्य सूत्रधार असलेल्या नायजेरियन ड्रग्ज तस्कराला त्याच्या साथीदारासह अटक करण्यात आली, या कारवाईदरम्यान डीआरआयचे अधिकारी तसेच आरोपी किरकोळ जखमी झाले.

269
Crime : कुर्ल्यातील मोहम्मद कलिम चौधरीला २ कोटींच्या ड्रग्जसह अटक

महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीचे रॅकेट उध्वस्त केले आहे. (DRI Busts International Drugs Racket) या आंतरराष्ट्रीय रॅकेटमध्ये सामील असलेल्या दोन महिलांसह पाच जणांना डीआरआयने (DRI) अटक करून जवळपास १०० कोटी रुपये किंमतीचा कोकेन हा अमली पदार्थ जप्त केला आहे. (Drug Racket)

महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मंगळवारी दिवसांपूर्वी मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन (Mumbai Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) विदेशी महिलांना ९ किलो ८२९ ग्राम कोकेन या अमली पदार्थांसह अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या महिला इंडोनेशिया आणि थायलंड देशाच्या नागरिक आहेत. या दोघी आदिस अबाबा, इथिओपिया येथून कोकेन भारतात तस्करी करण्याच्या उद्देशाने आलेल्या होत्या, या दोघींजवळून जप्त करण्यात आलेल्या कोकेन या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत १०० कोटी रुपये किंमत असल्याची माहिती डीआरआयने (DRI) दिली. (DRI Busts International Drugs Racket)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : बारामतीसाठी देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई; हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न)

नाट्यमय पाठलाग करत गुन्हेगारांना अटक 

या दोघींकडे कसून चौकशी आणि त्यांचा पूर्वीचा इतिहास जाणुन घेतला असता या दोघी मागील अनेक वर्षांपासून या तस्करीच्या रॅकेटमध्ये सामील असल्याचे समोर आले, तसेच या दोघी विदेशातून आणलेले कोकेन दिल्ली आणि इतर राज्यात असलेल्या या रॅकेटमधील सदस्यांना पुरवठा करीत होत्या अशी धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर डीआरआयच्या (DRI) अधिकाऱ्यांनी तात्काळ पाऊले उचलून या रॅकेटचे पाळेमुळे खोदण्यास सुरुवात केली, डीआरआयचे एक पथक दिल्ली येथे रवाना झाले. या पथकाने एका आफ्रिकन नागरिकावर पाळत ठेवून त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली. (Drug Racket)

(DRI Busts International Drugs Racket) दरम्यान या आफ्रिकन नागरिकाच्या चौकशीत या रॅकेटचा मुख्य सूत्राधाराची माहिती समोर येताच डीआरआयच्या (DRI) अधिकाऱ्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने ग्रेटर नोएडामध्ये सापळा रचून मुख्य सूत्रधाराची ओळख पटवुन त्याला ताब्यात घेण्यात येत असताना रॅकेटच्या मुख्य सूत्राधाराने अधिकाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करून तेथून पळ काढला, डीआरआय (DRI) अधिकाऱ्यांनी नाट्यमय पाठलाग करून मुख्य सूत्रधार असलेल्या नायजेरियन ड्रग्स तस्कराला त्याच्या साथीदारासह अटक करण्यात आली, या कारवाईदरम्यान डीआरआयचे अधिकारी तसेच आरोपी किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी डीआरआयने आंतरराष्ट्रीय ड्रग्ज स्मगलिंग रॅकेटच्या या दोन्ही सदस्यांसह पाच जणांविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (DRI Busts International Drugs Racket)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.