Vanchit Bahujan Aghadi : मविआच्या जागा वाटपासंबंधीच्या शेवटच्या बैठकीलाही वंचितला आमंत्रण नाहीच; संबंध बिघडले

लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होऊन चार दिवस उलटल्यानंतरही महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीत युती होणार की यावरच घोडे अडलेले आहे.

541
महाविकास आघाडीकडून गुरुवारी मुंबईत लोकसभा जागा वाटपाच्या चर्चेसाठी बैठक ठेवण्यात आली आहे. जागा वाटपाच्यादृष्टीने ही शेवटच्या टप्प्यातील बैठक असूनही वंचितला (Vanchit Bahujan Aghadi) या बैठकीचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे आता महाविकास आघाडीने वंचितची आशा सोडून आपापल्या चर्चेला सुरुवात केल्याचे दिसत आहे. त्यामुळे मविआ आणि वंचितची युतीची बोलणी फिस्कटली की काय, असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.

वंचितला बैठकीचे निमंत्रण मिळण्याची अपेक्षा 

लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होऊन चार दिवस उलटल्यानंतरही महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीत (Vanchit Bahujan Aghadi) युती होणार की यावरच घोडे अडलेले आहे. त्यामुळे संपूर्ण महाविकास आघाडीचे लोकसभेचे जागावाटपच अडून बसलेले आहे. मविआ आणि प्रकाश आंबेडकर हे आपापल्या मागण्यावर ठाम असल्यामुळे युतीच्या शक्यता जवळपास मावळल्या आहेत. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांना 24 तासांचा अल्टिमेटमही दिला होता. हा अल्टिमेटम संपल्यानंतर प्रकाश आंबडेकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठवले होते. परंतु, त्यामुळे मविआ आणि वंचितच्या  (Vanchit Bahujan Aghadi) युतीबाबत काही ठोस घडू शकले नव्हते. अशातच आता समोर आलेल्या एका प्रकारामुळे मविआ आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील युतीची चर्चा फिस्कटल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.