World Poetry Day : २१ मार्च रोजी जागतिक कविता दिन का साजरा केला जातो?

१९९९ मध्ये, पॅरिस येथे झालेल्या UNESCO च्या ३० व्या अधिवेशनात "२१ मार्च" हा "जागतिक कविता दिन" म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. जागतिक कविता दिन हा मानवतेच्या सांस्कृतिक आणि भाषिक अभिव्यक्तीचा महत्वाचा अंग आहे. प्रत्येक काळात कविता ही माणसाच्या सांस्कृतिक जडणघडणीचा अविभाज्य भाग राहिलेली आहे.

364
World Poetry Day : २१ मार्च रोजी जागतिक कविता दिन का साजरा केला जातो?

दरवर्षी २१ मार्च रोजी जागतिक कविता दिन (World Poetry Day) जगभरात साजरा केला जातो. हा दिवस सांस्कृतिक आणि भाषिक अभिव्यक्तीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. युनेस्कोने कवी आणि कवितेच्या सर्जनशीलतेचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. जागतिक कविता दिनानिमित्त, भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय आणि साहित्य अकादमी यांच्यातर्फे जागतिक काव्य महोत्सव आयोजित केला जातो.

(हेही वाचा – Marathwada Earthquake : मराठवाड्यात जाणवले भूकंपाचे धक्के; ४.२ रिश्टर स्केल इतकी तीव्रता)

कवींचा सन्मान करण्याच्या उद्देशाने :

मित्रांनो, कविताच आहे जी आयुष्याचा मंत्र देते, मुठी आवळून अन्यायाविरुद्ध उभे राहायला बळ देते. कविता आनंद देते, भावूक करते. जागतिक कविता दिन साजरा करण्याचा उद्देश कवींचा सन्मान करणे, काव्यवाचनाच्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे आणि कवितेला प्रोत्साहन देणे हा आहे. तसेच कविता आणि नाट्य, नृत्य, संगीत आणि चित्रकला यासारख्या इतर कलांमध्ये कवितेला बढावा देणे. (World Poetry Day)

(हेही वाचा – Supreme Court : मोफत ‘भेटवस्तू’ देण्याच्या आश्वासनांबाबत सर्वोच्च न्यायालयाची कडक भूमिका)

UNESCO च्या ३० व्या अधिवेशनात घोषणा :

१९९९ मध्ये, पॅरिस येथे झालेल्या UNESCO च्या ३० व्या अधिवेशनात “२१ मार्च” हा “जागतिक कविता दिन” म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. जागतिक कविता दिन हा मानवतेच्या सांस्कृतिक आणि भाषिक अभिव्यक्तीचा महत्वाचा अंग आहे. प्रत्येक काळात कविता (World Poetry Day) ही माणसाच्या सांस्कृतिक जडणघडणीचा अविभाज्य भाग राहिलेली आहे. आजही अनेक आदिवासी गीते ऐकायला मिळतात. म्हणजे अगदी प्राचीन काळापासून काव्य अस्तित्वात आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Elections 2024 : महाराष्ट्र काँग्रेसकडून ‘या’ १२ उमेदवारांची घोषणा)

जागतिक कविता दिन (World Poetry Day) राष्ट्रीय आयोग, स्वयंसेवी संस्था आणि शाळा, कविता समुदाय, प्रकाशक, सांस्कृतिक गट, संग्रहालये यांसारख्या सार्वजनिक आणि खाजगी संस्थांच्या सक्रिय सहभागाने जगभरात साजरा केला जातो.

(हेही वाचा – PM Narendra Modi : आजच्या अस्थिर, अशांत आणि संक्रमणाच्या युगात लोकशाहीसमोर अनेक आव्हाने)

वाचकांनो, या जागतिक कविता दिनानिमित्त तुमच्या आवडीची कविता आम्हाला नक्की सांगा.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.