भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून कार्यकर्त्यांच्या बळावरच पक्षाचा आलेख वाढला आहे. याच कार्यकर्त्यांच्या जोरावर देशाला जागतिक महाशक्ती म्हणून गौरव प्राप्त करून द्यायचा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले. दक्षिण-पश्चिम नागपूर भाजपा बुथ शक्ती केंद्र आणि पदाधिकाऱ्यांचे संमेलनात गडकरी बोलत होते.
(हेही वाचा – Supreme Court : मोफत ‘भेटवस्तू’ देण्याच्या आश्वासनांबाबत सर्वोच्च न्यायालयाची कडक भूमिका)
यावेळी आमदार प्रवीण दटके, भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र कुकडे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी आमदार नाना श्यामकुळे, माजी महापौर नंदा जिचकार, दक्षिण-पश्चिमचे अध्यक्ष रितेश गावंडे, सर्वश्री राजीव हडप, अविनाश ठाकरे, संदीप जोशी, रमेश घिरडे, रमेश सिंगारे, दिलीप दिवे, किशोर वानखेडे, प्रकाश भोयर, मुन्ना यादव यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. (Nitin Gadkari)
📍नागपूर
दक्षिण-पश्चिम नागपूरमधील भाजप 🪷 कार्यकर्त्यांचा मेळावा.#अपने_नागपुर_के_लिए#ApaneNagpurKeLiye#PhirEkBaarModiSarkar#AbkiBaar400Paar#LokSabhaElections2024#GeneralElections2024 @BJP4Maharashtra @BJP4India pic.twitter.com/XYDr3swFau
— Nitin Gadkari (मोदी का परिवार) (@nitin_gadkari) March 20, 2024
अनेक कार्यकर्त्यांनी पक्षासाठी आयुष्य वेचले :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ट्रिलियन अर्थव्यवस्था गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ते गाठण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला योगदान द्यायचे आहे, असेही गडकरी म्हणाले. ज्येष्ठ कार्यकर्त्यांबद्दलही त्यांनी गौरवोद्गार काढले. ते (Nitin Gadkari) म्हणाले, ‘अनेक कार्यकर्त्यांनी आयुष्य वेचले पक्षासाठी. ते कधीही मोठ्या पदावर पोहोचले नाही. त्यांना काहीच मिळाले नाही. पण तरीही प्रत्येकवेळी निवडणुकीत पूर्ण शक्तीने ते काम करतात.’
(हेही वाचा – Supreme Court : वारंवार पुरवणी आरोपपत्र दाखल करणे त्रासदायक; न्यायालयाची ईडीच्या कार्यशैलीवर नाराजी)
आपण पार्टी विथ डिफरन्स आहोत :
आपल्याला जनतेचे समर्थन आहे. जात-पात धर्म न पाळता प्रत्येकाचे काम केले. कोरोनामधील परिस्थिती हे त्याचे सर्वांत मोठे उदाहरण आहे. हीच आपल्या पक्षाची संस्कृती आहे. मानवतेच्या आधारावर समाजनिर्मितीचे काम भाषणातून नव्हे तर व्यक्तीगत कृतीमधून होणार आहे, असेही गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले. आपला इतिहास, संस्कृती, परंपरा आणि त्याला जोडून आर्थिक विकास या जोरावर आपल्याला विश्वगुरू व्हायचे आहे. आपल्याला जात-पंथ-धर्माच्या पलीकडे जाऊन समाज उभा करायचा आहे. आर्थिक, सामाजिक समरसता असलेला समाज निर्माण करायचा आहे. त्या उद्दिष्ट्यांकरिता आपण सारे काम करतो. म्हणूनच आपण पार्टी विथ डिफरन्स आहोत, याचाही त्यांनी (Nitin Gadkari) आवर्जून उल्लेख केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community