-
ऋजुता लुकतुके
दुखापतीतून पूर्णपणे सावरेला नसल्यामुळे मुंबईचा मुख्य फलंदाज सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) आयपीएल मोहीम यंदा थोडी उशिरा सुरू होणार आहे. मैदानापासून लांब असला तरी सूर्यकुमार आयसीसीच्या टी-२० फलंदाजांच्या यादीत (ICC T20 Ranking) आपलं अव्वल स्थान मागचे तीन महिने टिकवून आहे. त्याचे ८६१ रेटिंग गुण आहेत. तर त्याच्या मागोमाग असलेल्या फील सॉल्टचे ८०१ गुण आहेत.
डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर सूर्यकुमारने (Suryakumar Yadav) भारतीय संघाचं टी-२० प्रकारात नेतृत्व केलं. संघाला २-१ असा विजयही मिळवून दिला. आणि ते करताना दुसऱ्या सामन्यात विक्रमी पाचवं शतकही झळकावलं. पण, या दौऱ्यानंतर सूर्यकुमारला हार्नियाचं दुखणं जडलं. आणि अखेर काही महिन्यांपूर्वी त्याच्यावर दक्षिण आफ्रिकेत शस्त्रक्रिया पार पडली. आचा सूर्यकुमार या शस्त्रक्रियेतून सावरला असला तरी अजून क्रिकेट खेळण्या इतका तंदुरुस्त झालेला नाही. पहिल्या टप्प्यात तो खेळण्याची शक्यता नाही. (ICC T20 Ranking)
(हेही वाचा – Virat Kohli : बंगळुरूच्या श्रेयांकाची विराट कोहलीबरोबर ‘फॅन – मोमेंट’)
🔸 Rashid Khan’s roaring T20I comeback rewarded
🔸 Pathum Nissanka enters ODI top 10Latest from the ICC Men’s Player Rankings update 👉 https://t.co/5XodpkmEFq pic.twitter.com/KHcARnJhA4
— ICC (@ICC) March 20, 2024
क्रमवारीबद्दल बोलायचं झालं तर अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशिद खानही पुन्हा एकदा गोलंदाजांच्या यादीत पहिल्या दहांत पोहोचला आहे. राशिदने अलीकडे अफगाणिस्तानच्या आयर्लंड वरील २-१ विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. राशिदही दुखापतीतून नुकताच परतला आहे. आणि आयर्लंड विरुद्ध मालिकेत ८ बळी मिळवत त्याने क्रमवारीतही चार स्थानांची झेप घेतली आहे. आता तो नवव्या स्थानावर स्थिर झाला आहे. (ICC T20 Ranking)
यंदा फलंदाजी आणि गोलंदाजीतही पहिल्या दहा खेळाडूंत अफगाणिस्तान आणि बांगलादेशच्या खेळाडूंचा भरणा आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community