MSD Should Open : महेंद्रसिंग धोनीने सलामीला यावं असा धोशा चाहत्यांनी का लावला आहे

आयपीएलच्या पहिल्याच सामन्यापूर्वी चेन्नईच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर धोनीने सलामीला खेळण्याची मागणी केली आहे. (MSD Should Open)

170
IPL 2024 MS Dhoni : विराट नंतर धोनीनेही पार केला सामन्यांचा ‘हा’ टप्पा
  • ऋजुता लुकतुके

शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या सतराव्या आयपीएल हंगामात महेंद्रसिंग धोनी (MSD) पुन्हा एकदा आपल्याला चेन्नई फ्रँचाईजीच्या पिवळ्या जर्सीमध्ये दिसेल. चेन्नईचा कप्तान म्हणून त्याच्या खात्यात विक्रमी ५ विजेतेपदं आहेत. आणि नवीन हंगामाची सुरुवात तो भारतीय क्रिकेटमध्ये त्याचा उत्तराधिकारी ठरलेल्या विराट कोहलीच्या बंगळुरू संघाविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. २२ मार्चला चिदंबरम मैदानात होणारा हा सामना सगळ्यांची उत्कंठा वाढवणारा असेल. (MSD Should Open)

दोन्ही संघ चेन्नईत सरावही करत आहेत. आणि अशावेळी धोनीच्या सरावाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आधी तो व्हिडिओ पाहूया, (MSD Should Open)

(हेही वाचा – YouTube Disclosure Policy : युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करताना सावधान, कंपनीची असेल सक्त नजर)

महेंद्रसिंग या व्हिडिओमध्ये त्याचा लाडका हेलिकॉप्टर फटका मारताना दिसतोय. आणि जवळ जवळ प्रत्येक वेळी तो षटकार वसूल करतोय. त्यामुळे चेन्नईचे चाहते खुश झाले असून त्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. एक चाहता म्हणतो, ‘ऋतुराजबरोबर धोनीनेच सलामीला आलं पाहिजे.’ तर आणखी एक चाहता म्हणतोय, ‘या हंगामात आपल्याला कामगिरीचा कळस गाठलेला धोनी बघायला मिळणार तर!’ (MSD Should Open)

(हेही वाचा – RBI : ३१ मार्चला रविवार असूनही बँका राहणार सुरु)

धोनी व्हीलचेअरवर असेल तरी दोन तास फलंदाजी करून जाईल – रॉबिन उथप्पा

४२ वर्षीय धोनी सलग सतरा हंगाम चेन्नईकडून खेळला आहे. आणि हा कदाचित त्याचा शेवटचा हंगाम असेल असं बोललं जातंय. जिओ सिनेमाला मध्यंतरी दिलेल्या मुलाखतीत त्याने तसं सुतोवाचही केलं होतं. त्यामुळे धोनीविषयी सगळ्यांना उत्सुकता आहे. धोनीचा चेन्नई संघातील माजी साथीदार सुरेश रैना धोनीविषयी म्हणतो, ‘धोनी आयपीएलची चांगली तयारी करतो. तो २-३ महिने आधी चेन्नईला येतो. इथल्या दमट वातावरणात स्वत:ला रुळवतो. आणि मग फलंदाजीचा जोरदार सराव करून हंगामाला सामोरं जातो. या त्याच्या नित्यक्रमामुळेच तो इतके हंगाम खेळू शकला आहे.’ (MSD Should Open)

पण, हा शेवटचा हंगाम असेल असं रैनालाही वाटतं. तर रॉबिन उथप्पानेही धोनीच्या निवृत्तीवर भाष्य केलं आहे. ‘धोनी व्हीलचेअरवर असेल तरी दोन तास फलंदाजी करून जाईल. इतका तंदुरुस्त तो नक्की आहे. पण, तो २० षटकं यष्टीरक्षण करु शकेल, असं मला वाटत नाही.’ अर्थात, धोनीने अजून आपल्या निवृत्तीविषयी कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही. (MSD Should Open)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.