Stock Market Holidays : पुढील आठवड्यात २ दिवस राष्ट्रीय आणि मुंबई शेअर बाजार बंद राहणार

पुढील आठवड्यात होळी आणि गुड फ्रायडेची सुट्टी येतेय.

203
Equity Returns : दीर्घकालीन शेअर गुंतवणुकीतून लोकांना सर्वाधिक फायदा झाल्याचा मॉर्गन स्टॅनलीचा अहवाल
  • ऋजुता लुकतुके

मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्यामुळे महत्त्वाचा आहे. आणि त्यातच यंदा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दोन दिवस मोठ्या सुट्ट्या येत आहेत. सोमवारी होळी (Holi) आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची (Good Friday) सुट्टी असणार आहे. या दोन दिवसी राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजारही बंद असतील. (Stock Market Holidays)

२५ मार्च आणि २९ मार्च असे हे दोन दिवस असतील. त्यामुळे पुढील आठवड्यात शेअर बाजाराचं कामकाज फक्त ३ दिवस चालेल. या दोन दिवशी कुठले व्यवहार नेमके बंद असतील ते पाहूया,

(हेही वाचा – ICC T20 Ranking : सूर्यकुमार यादव फलंदाजांच्या यादीत अव्वल)

२५ मार्च आणि २९ मार्च या दोन दिवशी शेअरमधील सौदे, वायदे बाजारातील सौदे, तसंच समभागांचं हस्तांतरणही बंद राहील. तसंच कुठलेही शेअर उधारीनेही तुम्हाला घेता किंवा विकता येणार नाहीत. या दोन दिवशी चलन बाजारातील वायद्याचे सौदेही बंद राहतील. कमोडिटी बाजारात मात्र होळीच्या दिवशी अर्ध्यावेळची सुट्टी असेल. बाजार पूर्णवेळ बंद राहणार नाहीत. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत कमोडिटी बाजार बंद असतील. तर संध्याकाळचं सत्र नेहमीप्रमाणे संध्याकाळी सात ते मध्यरात्रीपर्यंत पार पडेल. (Stock Market Holidays)

कमोडिटीजचं वेळापत्रक इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट्सलाही (EGR) लागू होईल. २९ मार्चला गुड फ्रायडेच्या (Good Friday) दिवशी मात्र कमोडिटी बाजार आणि ईजीआरही पूर्णवेळ बंद राहील. २०२४ साल तसंही नेहमीपेक्षा जास्त सुट्यांनी भरलेलं आहे. आणि मार्चनंतर उर्वरित महिन्यांत आणखी १० दिवस सुट्यांचे आहेत. (Stock Market Holidays)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.