लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. ऑनलाइन चुकीची माहिती पसरविणाऱ्या ‘फेक न्यूज’वरही पथकाचे विशेष लक्ष राहणार आहे. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Holi Festival 2024 : ‘होळी’ सणासाठी अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई)
सोशल मीडियावर विशेष लक्ष
दोन समाजात तेढ निर्माण होईल, धार्मिक, जातीय भावना दुखावतील अशा पोस्ट, व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित होत असल्याने कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऑनलाइन चुकीची माहिती पसरविणाऱ्या ‘फेक न्यूज (fake news) ही काही जणांकडून पसरविल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही जिल्ह्यांत आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. ऑनलाइन फेक न्यूज, सोशल मीडियावर अक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करणाऱ्यांवर सायबर कक्षांचे विशेष लक्ष असणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन केले जाईल, याची प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे. सायबर कक्षाचे पथक सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे. अक्षेपार्ह मजकूर आढळल्यास नोटीस दिली जात आहे. खोटी माहिती पसरवल्यास निवडणूक आयोगातर्फे दिलेल्या निर्देशांप्रमाणे कठोर कार्यवाही करण्यात येईल. तसेच भारतीय दंड संहिता व माहिती तंत्रज्ञान कायदा (आयटी अॅक्ट) नुसारसुद्धा कठोर कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती सायबर कक्षातून देण्यात आली.
फेक न्यूजसंदर्भात तक्रार कोठे कराल?
फेक न्यूज असल्याचे आढळून आल्यास पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर कक्ष तसेच पोलिस ठाण्यात तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाप्तील कक्षातही तक्रार नोंदविता येईल.
…तर होणार कारवाई ?
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन चुकीची माहिती पसरविणाऱ्या ‘फेक न्यूज’वर विशेष लक्ष राहणार आहे. ‘फेक न्यूज’ अक्षेपार्ह मजकूर, पोस्ट, व्हिडीओ कोणी प्रसारित केल्याचे आढळल्यास थेट गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community