Vehicle Theft : देशभरात वाहनचोरीमध्ये मुंबई पाचव्या क्रमांकावर

161

वाहन चोरीमध्ये (Vehicle Theft)  देशातील सहा मेट्रो सिटीमध्ये आर्थिक राजधानी असलेली मुंबई पाचव्या क्रमांकावर आहे. तर राजधानी दिल्ली पहिल्या स्थानावर आहे. एका विमा कंपनीच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
२०२२मध्ये चैन्नईमध्ये ५ टक्के वाहन चोरी (Vehicle Theft) होत होती. त्यात वाढ होऊन २०२३ मध्ये वाहन चोरी १०.५ टक्के वाढली आहे. बेंगळुरुमध्ये २०२२ मध्ये वाहन चोरीचा दर ९ टक्के होता. चोरट्यांच्या होंडा डीआय, हिरो पॅशन या दोन गाड्या चोरट्यांच्या यादीत नव्याने दाखल झाल्या आहेत, तर होंडा अॅक्टिव्हा, रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० गाड्या चोरटे प्रामुख्याने लक्ष्य करत आहेत. तर हॅचबॅक, मारुती वॅगन आर आणि मारुती स्विफ्ट या चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहेत. त्यानंतर बुंदाई क्रेटा, हुंडाई सैंट्रो, होंडा सिटी आणि हुंडाई आय- १० अनुक्रमे चोऱ्या होत आहेत.

(हेही वाचा Congress : यंदा सोनिया, प्रियंका आणि राहुल गांधी काँग्रेसला देणार नाहीत मत; कारण…)

दिल्लीत दर १४ मिनिटांनी वाहनचोरी 

गेल्या वर्षी मुंबईतून २ हजार ६७१ वाहनांची चोरी झाली होती. तर २०२२ मध्ये ३ हजार ५८ वाहने चोरीला (Vehicle Theft) गेली होती. मुंबई पोलिसांनी गेल्या दोन वर्षात ५५ टक्के चोरीच्या गुन्ह्यांची उकल केली असून ४ हजार २५९ चोरीच्या वाहनांचा शोध घेतला आहे. चोरीच्या वाहनांमध्ये खासगी कार, दुचाकींचा समावेश असून दुचाकींचे प्रमाण अधिक आहे. एका विमा कंपनीने मेट्रो शहरांमधील वाहन चोरीसंदर्भात एक अहवाल सादर केला आहे. त्यात दिल्ली शहरात दर १४ मिनिटांनी एक वाहन चोरीला जात असून दिवसभरात २०२३ मध्ये वाहन चोरीचा दर १०.२ टक्यांपर्यत वाढला आहे. त्यानंतर हैद्राबाद, मुंबई आणि कोलकत्ता या शहरांचा क्रमांक लागतो. गेल्या वर्षी दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये ९.२५ टक्यांनी वाढ झाल्याचे अहवालात नमूद केले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.