मुंबई शहर आणि उपनगरांमधील करधारकांना निर्धारित कालावधीत त्यांच्या मालमत्तेचा करभरणा करता यावा आणि नागरिकांची ऐनवेळी गैरसोय होऊ नये, यासाठी साप्ताहिक तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमधील नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच, नागरिकांना सुलभपणे कर भरता यावा, यासाठी मार्गदर्शन आणि त्यांच्या अडचणींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या काळात प्रत्येक विभागांमध्ये उपलब्ध असतील. (BMC)
मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कर संकलन विभागाच्या वतीने वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे उद्दिष्टाइतके मालमत्ता कर संकलित करण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. आर्थिक वर्ष २०२३-२०२४ ची सुधारित मालमत्ता कर देयके फेब्रुवारी २०२४ अखेरीस पाठवण्यात आल्यानंतर मायकिंग, दर्शनीय ठळक बॅनर तसेच स्थानिक केबल, प्रसार माध्यम आणि समाज माध्यमांद्वारे जनजागृती तसेच मोबाईलवर एसएमएस पाठवून थकबाकीदारांना कर भरण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. (BMC)
दिनांक ३१ मार्च २०२४ हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्यामुळे त्यापूर्वी आपल्या मालमत्तेसंबंधीचे कर भरण्यासाठी नागरिकही मोठ्या प्रमाणात संबंधित प्रशासकीय विभागांमध्ये येत आहेत. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दिनांक २३ आणि २४ मार्च रोजी साप्ताहिक सुट्टी आहे. तर, दिनांक २५ मार्च रोजी धुलिवंदन आणि दिनांक २९ मार्च रोजी गुड फ्रायडेनिमित्त सार्वजनिक सुटी आहे. त्यावेळी, मालमत्ता करभरणा करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना या कालावधीत कर भरताना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि निर्धारित वेळेत त्यांचा करभरणा व्हावा, यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील साप्ताहिक आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही करभरणा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय मबई महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे, अशी माहिती महापालिका जनसंपर्क विभागाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवले आहे. (BMC)
(हेही वाचा – Vehicle Theft : देशभरात वाहनचोरीमध्ये मुंबई पाचव्या क्रमांकावर)
बुधवारी २० मार्च २०२४ रोजी कर भरण्यासाठी पाठपुरावा केलेल्या ‘टॉप टेन’ मालमत्ता करधारकांची यादी –
- न्यू लूक कन्स्ट्रक्शन्स प्रा. लि (एफ उत्तर विभाग) – १४ कोटी ४८ लाख ८९ हजार २४१ रुपये.
- श्री. साई ग्रुप ऑफ कंपनीज (के पश्चिम विभाग) – १४ कोटी ०७ लाख ९४ हजार ९८३ रुपये.
- कल्पतरू रिटेल व्हेंचर्स प्रा. लि. (एच पूर्व विभाग) – १० कोटी ७० लाख ७२ हजार १६२ रुपये.
- एव्हीएएलपी (आर मध्य विभाग) – १० कोटी ३८ लाख ७१ हजार ६६८ रुपये.
- न्यू लूक कन्स्ट्रक्शन्स प्रा. लि (एफ उत्तर विभाग) – ०८ कोटी ९२ लाख ४४ हजार ६३१ रुपये.
- पीआरएल अगस्त्य प्रा. लि. (एल विभाग ) – ०७ कोटी ४२ लाख ९५ हजार ८९४ रुपये.
- चंपकलाल के वर्धन आणि कंपनी – (जी उत्तर विभाग) – ०४ कोटी ९४ लाख ९१ हजार ०७० रुपये.
- केबल कॉर्पेारेशन ऑफ इंडिया – (आर मध्य विभाग) ०३ कोटी ५४ लाख ७० हजार २५३ रुपये.
- द टिंबर मार्केट (ई विभाग) – ०१ कोटी ५४ लाख १० हजार ४३८ रुपये.
- सुप्रीम सुखधाम (एच पश्चिम विभाग) – ०१ कोटी २२ लाख २४ हजार ३५२ रुपये. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community