Neelam Gorhe : राज ठाकरेंनी उघडपणे भेट घेतली, काही जण गुपचूप; अमित शाहांच्या भेटीविषयी नीलम गोऱ्हे काय म्हणतात ?

Neelam Gorhe : 'राज ठाकरेंनी उघडपणे अमित शाहांची (Amit Shah) भेट घेतली, काही जण गुपचूप भेटी घेतात', असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

226
Neelam Gorhe : राज ठाकरेंनी उघडपणे भेट घेतली, काही जण गुपचूप; अमित शाहांच्या भेटीविषयी नीलम गोऱ्हे काय म्हणतात ?
Neelam Gorhe : राज ठाकरेंनी उघडपणे भेट घेतली, काही जण गुपचूप; अमित शाहांच्या भेटीविषयी नीलम गोऱ्हे काय म्हणतात ?

राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मराठी भाषेच्या प्रश्नासाठी कायमच आग्रहाची भूमिका घेतली पाहिजे. अमित शाह यांच्यासोबत राज ठाकरेंनी उघडपणे भेट घेतली आहे. काहीजण गुपचूप भेटी घेतात. राजकारणात कुणी कुणाला भेटू शकते. राजकारणाचा तो पाया आहे. राज ठाकरेंशी संवाद आणि त्यातून महाराष्ट्रासाठी काही चांगले झाले, तर त्याचे मी स्वागतच करते, असे विधानपरिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी म्हटले आहे. या वेळी त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला.

(हेही वाचा – Congress : यंदा सोनिया, प्रियंका आणि राहुल गांधी काँग्रेसला देणार नाहीत मत; कारण…)

काही जण गुपचूप भेटी घेतात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे महायुतीत सहभागी होणार यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अमित शाह यांच्या भेटीनंतर आज राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची एका हॉटेलमध्ये भेट झाली. यावरून विरोधकांनी टीका सुरू केली. त्या वेळी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी खोचक टोला लगावला आहे. ‘राज ठाकरेंनी उघडपणे अमित शाहांची (Amit Shah) भेट घेतली, काही जण गुपचूप भेटी घेतात’, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला.

कुठला निष्कर्ष काढणे शक्य नाही

नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे धोरण होते. यातून अनेकदा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज ठाकरेंच्या भेटी झाल्या आहेत. राज ठाकरेंनी नेहमीच सरकारला सकारात्मक सल्ला देण्याचे काम केले आहे. काही सरकारांनी त्यांना सन्मान दिला. काहींनी त्यांचे ऐकले नाही. ही भावनिक, सामाजिक आणि राजकीय भेट आहे. त्याच्यातून आत्ताच कुठला निष्कर्ष काढणे शक्य नाही. बेरजेचे राजकारण जो शब्द यशवंतराव चव्हाणांनी तयार केला. काही लोकांचे राजकारण उण्याचे असते. कुणाला तरी उतरवून, काढून टाकू, असे असते. त्यात महाराष्ट्राचे हित नाही, असे त्यांनी सांगितले. (Neelam Gorhe)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.