जीवन जगताना सतत मोटिव्हेशनची गरज असते. कारण आपल्या भोवतालचं वातावरण इतकं नकारात्मक आहे की आपल्याला सतत सकारात्मक गोष्टी कराव्या लागतात. सतत सकारात्मक विश्वास राहावं लागतं. नाहीतर नकारात्मकता आपल्याला घट्ट मिठी मारेल. म्हणून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, जीवनाविषयीचे मराठी कोट्स (Life quotes in marathi).
हे मराठी कोट्स (Life quotes in marathi) तुम्हाला तुमचे विचार बदलण्यात आणि तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोन बदलण्यात मदत करतील. ते तुम्हाला सकारात्मक आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी प्रेरणा देतीत. हे कोट्स आपल्या माय मराठीत (Life quotes in marathi) आहेत, त्यामुळे ते आपल्या मनात घर करुन राहतील.
(हेही वाचा Mumbai Police : रिकव्हरीच्या नावाखाली वसुली; महिला पोलीस अधिकाऱ्यांसह तिघांवर विभागीय चौकशीचे आदेश)
जाणून घेऊया जीवनाविषयी मराठी कोट्स (life quotes in marathi):
- जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्ण असण्यातच त्याची गोडी सामावलेली असते.
- नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका.
- तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.
- जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही.
- समाधान म्हणजे अंत:करणाची संपत्ती आहे, ज्याला ही संपत्ती सापडली, समजा तो खरा सुखी माणूस आहे
- आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.
- आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करेन.
- अनेक माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात, तो विचार म्हणजे, “लोक काय म्हणतील?”
- लोक तुम्हाला कसे बघतात ते महत्त्वाचं नाही, तुम्ही स्वतःला कसे बघतात ते महत्त्वाचं आहे.
- आयुष्यात दुःखाशी संघर्ष केल्यानंतर चेहऱ्यावर उमटलेल्या हास्याइतके सुंदर काहीच नसते.
- आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, कारण इथे ’Once More’ नसतो.
- आयुष्यात समोर आलेली प्रत्येक आव्हाने जरूर स्वीकारा. कारण त्यातून तुम्हाला एक तर विजय मिळेल किंवा पराभवातून अनुभव मिळेल.
- जीवनात Struggle केल्याशिवाय माणूस Google वर येत नाही.
- जिंकण्याची मजा तेव्हाच येते, जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात.
- आयुष्यात ‘चुकीची व्यक्ती’ आपल्याला ‘योग्य धडा’ शिकवते, तेव्हा जीवन जगण्याची कला अवगत होते.
- आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का असतो आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.
- आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात की तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा.
- शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
- आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
- तडजोड’ म्हणजे सुखी आयुष्याचा ‘पासवर्ड’
Join Our WhatsApp Community