महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमधील जागावाटप अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेले नाही. तरीही काँग्रेसने (Congress) लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातील ५८ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामधील महाराष्ट्रातील ७ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश आहे.
कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge की अध्यक्षता में आयोजित ‘केंद्रीय चुनाव समिति’ की बैठक में लोकसभा चुनाव, 2024 के लिए 57 लोकसभा सीटों पर कांग्रेस उम्मीदवारों के नाम की तीसरी लिस्ट जारी की गई। pic.twitter.com/7TMkx4faZ4
— Congress (@INCIndia) March 21, 2024
(हेही वाचा CM Arvind Kejriwal यांना अटक; दारू घोटाळ्यातील चौकशीनंतर ED ची कारवाई)
महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये काँग्रेसला (Congress) मिळणाऱ्या संभाव्य जागांवरील उमेदवारांची घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे. यात नंदूरबार, अमरावती, नांदेड, पुणे, लातूर, सोलापूर, आणि कोल्हापूर या मतदारसंघांचा समावेश आहे. यातील चार मतदारसंघ हे आरक्षित आहेत. यामध्ये काँग्रेसने नंदूरबारमधून जी.के. पाडवी, अमरावतीमधून बळवंत वानखेडे, नांदेडमधून वसंतराव चव्हाण, पुण्यामधून रवींद्र धंगेकर, लातूरमधून शिवाजीराव काळगे, सोलापूरमधून प्रणिती शिंदे आणि कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमुळे काही मतदारसंघातील प्रमुख लढतींचे चित्र स्षष्ट झाले आहे. त्यामध्ये नंदूरबारमध्ये भाजपाच्या हीना गावित विरुद्ध काँग्रेसचे (Congress) जी.के. पाडवी यांच्यात लढत होईल. तर पुण्यामध्ये भाजपाचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर यांच्यात मुख्य लढत होईल. तर नांदेडमध्ये भाजपाचे प्रतापवार चिखलीकर यांच्याविरुद्ध वसंतरावर चव्हाण यांच्यात मुख्य लढत होईल.
Join Our WhatsApp Community