Electoral Bonds : कोणत्या राजकीय पक्षाला किती मिळाल्या देणग्या; एसबीआयची यादी काय सांगते ?

Electoral Bonds : राजकीय पक्षांना सर्वाधिक देणगी देणाऱ्या ‘फ्युचर गेमिंग’ने १,३६८ कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले. या कंपनीने द्रमुकला ५०९ कोटी, वायएसआर काँग्रेसला १६० कोटी, भाजपला १०० कोटी आणि काँग्रेसला ५० कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या आहेत.

237
Electoral Bonds : कोणत्या राजकीय पक्षाला किती मिळाल्या देणग्या; एसबीआयची यादी काय सांगते ?
Electoral Bonds : कोणत्या राजकीय पक्षाला किती मिळाल्या देणग्या; एसबीआयची यादी काय सांगते ?

सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) दिलेल्या माहितीनुसार निवडणूक आयोगाने गुरुवार, २१ मार्च निवडणूक रोख्यासंदर्भातील माहिती जाहीर केली. या माहितीत बरेच गौप्यस्फोट झाले आहेत. सांतियागो मार्टिनच्या ‘फ्युचर गेमिंग’ने (Future Gaming) देशभरातील बहुतेक राजकीय पक्षांना देणग्या दिल्या आहेत. (Electoral Bonds)

गेल्या वेळी उघड झालेल्या यादीत ५४० कोटी रुपयांची देणगी मिळविणारा तृणमूल काँग्रेस ‘फ्युचर गेमिंग’चा सर्वांत मोठा लाभार्थी असल्याचे उघड झाले होते. या वेळी समोर आलेल्या यादीत भाजप, काँग्रेस, द्रमुक, वायएसआर काँग्रेस या पक्षांनाही राजकीय देणग्या देण्यात आल्याचे उघड झाले आहे. (Election Commission of India)

(हेही वाचा – IPL 2024, CSK vs RCB : ‘धोनी कर्णधार नसला तरी ऋतुराजसाठी अनमोल ठेवा असेल’)

राजकीय पक्षांना सर्वाधिक देणगी देणाऱ्या ‘फ्युचर गेमिंग’ने १,३६८ कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले. या कंपनीने द्रमुकला ५०९ कोटी, वायएसआर काँग्रेसला १६० कोटी, भाजपला १०० कोटी आणि काँग्रेसला ५० कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या आहेत. सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा आणि सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट या सिक्कीममधील राजकीय पक्षांना १० कोटींपेक्षा कमी रक्कम मिळाली आहे.

कोणत्या राजकीय पक्षाला किती देणग्या
  • हैदराबाद येथील मेघा इंजिनिअरिंग (Megha Engineering) हा दुसरा सर्वात मोठा देणगीदार आहे. मेघा इंजिनिअरिंगने ९६६ कोटींचे निवडणूक रोखे खरेदी केले आहेत. भाजप, भारत राष्ट्र समिती आणि द्रमुक त्याचे लाभार्थी आहेत.
  • ‘क्विक सप्लाय’ या कंपनीने ४१० कोटींचे निवडणूक रोखे खरेदी केले आहेत. ‘क्विक सप्लाय’ने भाजपला ३९५ कोटी आणि शिवसेनेला २५ कोटी रुपये दिले.
  • वेदांत, भारती एअरटेल, मुथूट, बजाज ऑटो, जिंदाल ग्रुप आणि टीव्हीएस मोटर यांसारख्या बड्या कंपन्यांकडून भाजपला मोठा निधी मिळाला आहे.
  • वेदांत समूहाने भाजप काँग्रेस, बिजू जनता दल आणि तृणमूल काँग्रेसला, भारती एअरटेलने भाजप, राष्ट्रीय जनता दल, शिरोमणी अकाली दल, काँग्रेस, जनता दल (संयुक्त) यांना देणगी दिली आहे.
  • मुथूट यांनी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांना देणग्या दिल्या.
  • उद्याोगपती लक्ष्मी निवास मित्तल यांनी भाजपला देणगी दिली आहे.
  • बायोकॉनचे प्रमुख किरण मुझुमदार शॉ यांनी भाजप, तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसला देणगी दिली आहे.
  • रुंगटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडने काँग्रेस, भाजप, तृणमूल काँग्रेस आणि सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाला देणगी दिली. (Electoral Bonds)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.