ऋजुता लुकतुके
शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये (IPL 2024) दोन महत्त्वाचे नियम बदलले आहेत. एक म्हणजे एका षटकांत आता दोन बाऊन्सरना परवानगी असेल. तर तिसऱ्या पंचांनी दिलेले निर्णय अधिक बिनचूक असावेत यासाठी डीआरएस प्रणालीला आता स्मार्ट रिप्ले प्रणाली जोडली जाणार आहे. बीसीसीआयने या दोन नियम बदलांना परवानगी दिली आहे. (IPL 2024)
(हेही वाचा- IPL 2024, CSK vs RCB : ‘धोनी कर्णधार नसला तरी ऋतुराजसाठी अनमोल ठेवा असेल’)
गेल्या हंगामापासून इम्पॅक्ट खेळाडूचा नियम सुरू करण्यात आला होता. तो नियमही या हंगामात सुरू राहील. स्पर्धेचा पहिला सामना शुक्रवारी चेन्नई सुपरकिंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्या दरम्यान होणार आहे. (IPL 2024)
कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका षटकांत दोन बाऊन्सर टाकता येतात. त्या पुढील प्रत्येक बाऊन्सर हा नोबॉल धरला जातो. पण, टी-२० क्रिकेटमध्ये अजूनही एका षटकांत एकाच बाऊन्सरचा नियम आहे. पण, त्यामुळे फलंदाजाला रोखण्याचे कमी पर्याय गोलंदाजाकडे उरतात. आणि खेळ फलंदाजांना धार्जिणा होतो. पण, आता बीसीसीआयने (BCCI) आयपीएलमध्ये हा प्रयोग करायचं ठरवलं आहे. देशांतर्गत टी-२० स्पर्धा सय्यद मुश्ताक टी-२० स्पर्धेतही बीसीसीआयने यापूर्वी या नियमाची चाचपणी केलेली आहे. (IPL 2024)
(हेही वाचा- Supriya Sule : सुप्रिया सुळे यांचे पोलीस अधीक्षकांना पत्र; म्हणाल्या, रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना…)
या व्यतिरिक्त स्मार्ट रिप्ले प्रणालीमध्ये टीव्ही पंचाला हॉक-आयचं प्रसारण थेट मिळू शकेल. आणि पूर्वीपेक्षा जास्त व्हीडिओ अँगल तसंच स्प्लिट स्क्रीनचा पर्याय त्यांच्याकडे असेल. त्यामुळे तिसऱ्या पंचांच्या निर्णयात अचूकता येईल. आयपीएल सामन्यांदरम्यान मैदानात आठ हॉक-आय कॅमेरे बसवलेले असतील. आणि मैदानात अपील झालं तर लागलीच हे कॅमेरे पंचांना आपल्याकडे असलेली चित्र पाठवून देतील. निर्णयाचा वेगही त्यामुळे वाढू शकणार आहे. (IPL 2024)
(हेही वाचा- Election Commission : ‘विकसित भारताचे संदेश पाठवणे थांबवा’ ; निवडणूक आयोगाने दिले केंद्राला आदेश)
याशिवाय यष्टीरक्षकाने घेतलेला झेल आणि यष्टीचीतचा निर्णय यासाठी आता स्मार्ट रिप्ले प्रणालीची मदत घेता येणार आहे. आयसीसीने सामने जलद गतीने संपावेत यासाठी स्टॉप क्लॉकचा नियम आणला आहे. त्यानुसार, दोन षटकांमध्ये आणि दोन चेंडूंमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाला काही ठरावीक सेकंदांचाच वेळ मिळतो. पण, हा नियम बीसीसीआयने (BCCI) आयपीएलमध्ये ठेवलेला नाही. (IPL 2024)