- ऋजुता लुकतुके
भारतीय (Ind ) संघाने गोलच्या चांगल्या संधी दवडल्या. आणि अफगाणिस्तानचा (Afg) संघ भारतावर मात करता करता राहिला असंच या सामन्याचं वर्णन केलं जाईल. शेवटी आशियाई फिफा पात्रता स्पर्धेच्या ए गटातील साखळी सामन्यात भारत (Ind ) आणि अफगाणिस्तान (Afg) हा सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. ए गटातील दुसरं स्थान भारताने कायम राखलं आहे. पण, या सामन्यातून अफगाणिस्तानला स्पर्धेतील पहिला गुण मिळाला आहे. भारताने मात्र ३ गुण मिळवण्याची संधी हुकवली. (Ind vs Afg Football)
(हेही वाचा- ISRO Pushpak : २१ व्या शतकात पुष्पकचे यशस्वी लॉन्चिंग; जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये)
भारतीय संघाला अफगाण गोलजाळ्याच्या समोर हेडरच्या कित्येक संधी चालून आल्या होत्या. पण, इतक्या जवळूनही एकही नेम बरोबर लागला नाही. त्यामुळे समालोचक तर विनोदाने असं म्हणालेही की, भारतीय (Ind) खेळाडूंना हेडरसाठी एका प्रशिक्षकाची गरज आहे. शिवाय मैदानात रचलेल्या चांगल्या चालींचा फायदाही त्यांना करुन घेता आला नाही. (Ind vs Afg Football)
FT | 🇦🇫 Afghanistan 0️⃣- 0️⃣ India 🇮🇳
It ends in a goalless draw as India hold on to second place in Group A!#AsianQualifiers pic.twitter.com/0vBYRtW1vL
— #AsianCup2023 (@afcasiancup) March 21, 2024
भारतासाठी हा सामना तुलनेनं सोपा समजला जात होता. आणि पहिल्या मिनिटापासून सुनील छेत्रीच्या (Sunil Chhetri) संघाने आक्रमण करत आपला इरादा दाखवून दिला. मनशेर सिंगकडे पहिल्या हाफमध्ये दोन संधी चालूनही आल्या होत्या. पण, त्यातून गोल काही होऊ शकला नाही. सतराव्या मिनिटाला ही संधी हुकल्यानंतर भारतीय आक्रमण काहीसं दिशाहीन होत गेलं. चेंडूचा ताबाही भारतीय पथकाकडे म्हणावा तसा राहत नव्हता. (Ind vs Afg Football)
(हेही वाचा- IPL 2024 : ‘हे’ आहेत आयपीएलचे बदललेले २ नियम )
५८व्या मिनिटाला भारताकडे गोलची खरी संधी चालून आली होती. डाव्या बगलेतून आकाश मिश्राने चेंडूचा ताबा मिळवत सुरेख चाल रचली. आणि ऐनवेळी त्याने चेंडू विक्रम प्रताप सिंगकडे सोपवला. डाव्या पायाने मारलेला हा फटका दिशा चुकून गोलजाळ्याच्या बाहेरून गेला. ही भारताला मिळालेली सर्वोत्तम संधी होती. त्यानंतर ६२ आणि ८० व्या मिनिटालाही संधीचं गोलमध्ये रुपांतर झालंच नाही. आणि अखेर भारताला गोलशून्य बरोबरीत समाधान मानावं लागलं. (Ind vs Afg Football)
आशियाई स्तरावरील फिफा विश्वचषक पात्रता स्पर्धेची ही दुसरी फेरी सध्या सुरू आहे. आणि भारतीय संघ परदेशात काही सामने खेळणार आहे. भारताचा पुढील सामना मंगळवारी अफगाणिस्तान विरुद्धच होणार आहे. (Ind vs Afg Football)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community