Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांचा ‘हा’ व्हिडिओ का होतोय व्हायरल ?

Arvind Kejriwal : मुख्यमंत्रीपदी असतांना अटक झालेले अरविंद केजरीवाल हे देशातील पहिले मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या अटकेनंतर सोशल मीडियावर त्यांच्या भाषणाचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

306
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांचा 'हा' व्हिडिओ का होतोय व्हायरल ?
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांचा 'हा' व्हिडिओ का होतोय व्हायरल ?

दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी (Delhi Liquor Scam) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना इडीने अटक केली आहे. मुख्यमंत्रीपदी असतांना अटक झालेले अरविंद केजरीवाल हे देशातील पहिले मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या अटकेनंतर सोशल मीडियावर त्यांच्या भाषणाचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

(हेही वाचा – ISRO Pushpak : २१ व्या शतकात पुष्पकचे यशस्वी लॉन्चिंग; जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये)

काय आहे व्हिडिओमध्ये ?

उद्या मनीष सिसोदिया (Manish Sisodia) चोरी केली, तर त्याला तुरुंगात जावे लागेल; कारण तो माझा कोणा सख्खा नातेवाईक लागत नाही. उद्या आमच्या एखाद्या मंत्र्याने चोरी केली, तर त्याला तुरुंगात जावे लागेल; कारण तो आमचा कोणी सख्खा नातेवाईक लागत नाही. एखाद्या आमदाराने चोरी केली, तर त्याला तुरुंगात जावे लागेल; कारण तो आमचा कोणी सख्खा नातेवाईक लागत नाही. आणि उद्या मी चोरी केली, तर मलाही तुरुंगात जावे लागेल; कारण मी तुमचा कोणी सख्खा नातेवाईक लागत नाही, असे केजरीवाल यांनी एका भाषणात म्हटले आहे.

आपचे मंत्री, खासदार अटकेत

आज प्रत्यक्षातही आपचे मंत्री, सदस्य दिल्ली मद्य घोटाळ्यातील मनी लाँड्रींगच्याच आरोपाखाली तुरुंगात आहेत. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि राज्यसभा खासदार संजय सिंह (Sanjay Singh) हे या प्रकरणात आधीच तुरुंगात आहेत. आता याच प्रकरणात स्वतः मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही अटक झाली आहे.

दिल्लीचे तत्कालीन मंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Jain) हेही भ्रष्टाचाराच्या अन्य एका प्रकरणात सध्या अटकेत आहेत. भ्रष्टाचार निर्मूलनाच्या आंदोलनातून राजकारणात आलेले अरविंद केजरीवाल यांचे शब्द अशा प्रकारे खरे होत आहेत, याची सोशल मीडियावर मोठी चर्चा आहे. (Arvind Kejriwal)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.