ISRO Pushpak : २१ व्या शतकात पुष्पकचे यशस्वी लॉन्चिंग; जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये

इस्रोचे पुन: वापरता येण्याजोगे प्रक्षेपण वाहन पुष्पक शुक्रवार २२ मार्च रोजी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल चाचणी दरम्यान यशस्वीरित्या धावपट्टीवर उतरले आहे.

237
ISRO Pushpak : २१ व्या शतकात पुष्पकचे यशस्वी लॉन्चिंग; जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये

पुष्पक विमान (ISRO Pushpak) हे त्रेतायुगामध्ये रावणाकडे होते. हे विमान त्याच्या शक्ती आणि सौंदर्यासाठी ओळखले जात असे. आता २१ व्या शतकातही पुष्पक विमानाची चर्चा रंगली आहे. पण का? जाणून घेऊया.

(हेही वाचा – Prime Minister Narendra Modi दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर रवाना)

इस्रोने (ISRO Pushpak) एस. यू. व्ही. कारच्या आकाराचे पंखांचे रॉकेट विकसित केले आहे. इस्रोने याला ‘पुष्पक’ असे नाव दिले आहे. तसेच याला स्वदेशी स्पेस शटल देखील म्हटले जात आहे. कर्नाटकातील धावपट्टीवर त्याचे यशस्वी लँडिंग झाले.

यशस्वी चाचणी :

इस्रोचे पुन: वापरता येण्याजोगे प्रक्षेपण वाहन पुष्पक (ISRO Pushpak) शुक्रवार २२ मार्च रोजी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल चाचणी दरम्यान यशस्वीरित्या धावपट्टीवर उतरले आहे. RLV LX-02 लँडिंग प्रयोग सुरू केल्याने, पुन्हा वापरण्यायोग्य लॉन्च व्हेईकल (RLV) टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात एक मोठा टप्पा गाठला गेला आहे. (ISRO Pushpak)

New Project 2024 03 22T124335.274

(हेही वाचा – Electoral Bonds : कोणत्या राजकीय पक्षाला किती मिळाल्या देणग्या; एसबीआयची यादी काय सांगते ?)

हे’ आहे खास वैशिष्ट्य :

१. पुष्पक (ISRO Pushpak) हे पुन्हा वापरण्यायोग्य प्रक्षेपण करणारे विमान आहे. पंख असलेल्या विमानासारखे दिसणारे हे विमान आहे. या विमानाचे वजन 1.75 टन आहे.

२. अंतराळात प्रवेश किफायतशीर करण्यासाठी हे खूप प्रभावी पाऊल आहे.

३. हे पुन्हा वापरता येण्याजोगे प्रक्षेपण वाहन आहे, ज्याचा वरचा भाग सर्वात महागड्या उपकरणांनी सुसज्ज आहे.

४. याचं सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे अंतराळातील उपग्रहाला नंतर इंधन भरण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी परत आणण्यातही ते मदत करेल.

५. या प्रकल्पावर सरकारने १०० कोटींहून अधिक खर्च केला आहे. (ISRO Pushpak)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.