Arvind Kejriwal : केजरीवाल यांनी केली ईडीच्या अधिकाऱ्यांची हेरगिरी ?; झडतीत सापडली कागदपत्रे

Arvind Kejriwal : केजरीवालांच्या घरात सापडलेल्या कागदपत्रांमध्ये दोन अधिकाऱ्यांची नावे, त्यांचे पत्ते आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नाव, फोन नंबर आदी सापडले आहे. यातील एक अधिकारी प्रत्यक्ष छाप्यावेळी केजरीवालांच्या घरात हजर होता.

317
Arvind Kejriwal : केजरीवाल यांनी केली ईडीच्या अधिकाऱ्यांची हेरगिरी ?; झडतीत सापडली कागदपत्रे
Arvind Kejriwal : केजरीवाल यांनी केली ईडीच्या अधिकाऱ्यांची हेरगिरी ?; झडतीत सापडली कागदपत्रे

दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) अटकेपासून संरक्षण नाकारल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. ईडीने २१ मार्चच्या सायंकाळी केजरीवाल यांच्या निवासस्थानी धाड टाकली होती. या वेळी घेण्यात आलेल्या झडतीत ईडीला काही कागदपत्रे सापडली आहेत. (Arvind Kejriwal)

(हेही वाचा – Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांचा ‘हा’ व्हिडिओ का होतोय व्हायरल ?)

कागदपत्रांमध्ये ईडीच्या दोन अधिकाऱ्यांची नावे

अबकारी घोटाळ्यात अटक झालेल्या केजरीवाल यांनी ईडी अधिकाऱ्यांवर पाळत ठेवल्याचे या कागदपत्रांमधून समोर आल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. केजरीवालांच्या घरात सापडलेल्या कागदपत्रांमध्ये दोन अधिकाऱ्यांची नावे, त्यांचे पत्ते आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नाव, फोन नंबर आदी सापडले आहे. यातील एक अधिकारी प्रत्यक्ष छाप्यावेळी केजरीवालांच्या घरात हजर होता. ईडीने या अधिकाऱ्यांची नावे सांगितली नसून स्पेशल डायरेक्टर रँक आणि जॉईंट डायरेक्टर या पदांवरील हे दोन अधिकारी असल्याचे सांगितले आहे. हे पुरावे ईडी न्यायालयात मांडणार आहे.

अबकारी घोटाळ्यातील पैसा आपने गोव्यातील निवडणुकीत वापरल्याचा आरोप ईडीने केला आहे. याप्रकरणी गोव्यातील आप उमेदवारांचा जबाबही नोंदवण्यात आला आहे.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवार, 21 मार्च रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळ्याशी (Delhi Liquor Scam) संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली. तत्पूर्वी, दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने या प्रकरणात या टप्प्यावर केजरीवाल यांना दंडात्मक कारवाईपासून अंतरिम संरक्षण देणारा आदेश पारित करण्यास नकार दिला. केंद्रीय तपास संस्थेने जारी केलेल्या समन्सला आव्हान देत केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.