Paris Olympic Games 2024 : भारतीय पथकाचं नेतृत्व करणार शरथ कमल, तर मेरी कोम शेफ द मिशन 

Paris Olympic Games 2024 : आपलं पाचवं ऑलिम्पिक खेळणाऱ्या शरथ कमलला पॅरिसमध्ये भारतीय ध्वज वाहून नेण्याचा मान मिळणार आहे 

161
Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकचं विक्रमी तिकीट विक्री 
Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकचं विक्रमी तिकीट विक्री 
  • ऋजुता लुकतुके

राष्ट्रकूल विजेता आणि ४ ऑलिम्पिक खेळांचा अनुभव असलेला टेबलटेनिसपटू अचंता शरथ कमल (Achanta Sharath Kamal) यंदा पॅरिस ऑलिम्पिकच्या (Paris Olympics) उद्घाटन सोहळ्यात भारतीय पथकाचं नेतृत्व करणार आहे. भारतीय ध्वज सगळ्यात पुढे शरथच्या हातात असेल. तर दिग्गज मुष्टीयोद्धा मेरी कोम संघाची शेफ द मिशन असेल. (Paris Olympic Games 2024)

(हेही वाचा- Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांचा ‘हा’ व्हिडिओ का होतोय व्हायरल ?)

‘भारतीय संघाची एकात्मता आणि संघातील ऊर्जा ही शरथ कमलच्या अनुभवी नेतृत्वामुळे वाढेल,’ असं हा निर्णय जाहीर करताना ऑलिम्पिक असोसिएशनने (Olympic Association) म्हटलं आहे. तर दिग्गज मुष्टीयोद्धा आणि स्वत: ऑलिम्पिक कांस्य जिंकलेली मेरी कोम आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा वापर भारतीय पथकाला करून देऊ शकेल असं ऑलिम्पिक असोसिएशनला वाटतं. मेरी कोमबरोबर सहाय्यक शेफ द मिशन म्हणून शिवा केशवनही संघाबरोबर असणार आहेत. (Paris Olympic Games 2024)

नेहमीप्रमाणे भारतीय पथकाला आताही नेमबाजांकडून पदकाची आशा आहे. यावेळी नेमबाजांचा संघ अनुभवी गगन नारंगच्या हातात असेल. यंदा भारताचे विक्रमी १९ नेमबाज पॅरिस ऑलिम्पिकसाठी आतापर्यंत पात्र ठरले आहेत. तर पात्रतेच्या अजून काही स्पर्धा बाकी आहेत. त्यामुळे ही संख्या वाढूही शकते. नेमबाजीच्या स्पर्धा पॅरिस शहरापासून थोड्या दूर होणार आहेत. नेमबाज उद्‌घाटन सोहळ्याला नसतील. गगन नारंग यांनी २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकलं होतं. (Paris Olympic Games 2024)

या नवीन नेमणुकांबद्दल ऑलिम्पिक असोसिएशनच्या (Olympic Association) अध्यक्ष पी टी उषा (PT Usha) यांनी समाधान व्यक्त केलं आहे. ‘संघाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी अनुभवी, क्रीडा क्षेत्राला वाहून घेतलेल्या लोकांच्या देण्यात आली आहे. त्यांचा अनुभव, कौशल्य यांचा भारतीय खेळाडूंना उपयोगच होणार आहे. आणि त्यांच्याकडून आताच्या खेळाडूंना प्रेरणाही मिळेल,’ असं पी टी उषा यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं. (Paris Olympic Games 2024)

(हेही वाचा- ISRO Pushpak : २१ व्या शतकात पुष्पकचे यशस्वी लॉन्चिंग; जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये)

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा २६ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान रंगणार आहेत. उद्घाटनाचा सोहळा २६ जुलैला ऑलिम्पिक स्टेडिअममध्ये होईल. (Paris Olympic Games 2024)

हेही पहा-
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.