BJP : भाजपा कार्यालयांच्या बाहेर पोलीस बंदोबस्तात का वाढ केली ?

231
BJP : भाजपा कार्यालयांच्या बाहेर पोलीस बंदोबस्तात का वाढ केली ?
BJP : भाजपा कार्यालयांच्या बाहेर पोलीस बंदोबस्तात का वाढ केली ?
दिल्लीचे आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना  शंभर कोटी रुपयांच्या कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात ईडीने अटक केल्यानंतर राज्यभरातील भाजपा (BJP) कार्यालय तसेच नेत्यांच्या कार्यालयांच्या बाहेरचा सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. (BJP)
भाजपा (BJP) प्रदेश कार्यालयाबाहेर सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. त्याचे कारण देखील तसेच आहे आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अटकेनंतर राज्यभरात आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून करतात आंदोलने करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे मुख्य नेते तसेच भाजपाच्या कार्यालयांच्या बाहेरची सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले दिसून येत आहे. नागपुरात देखील नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या कार्यालयाच्या बाहेर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती नागपूर पोलिसांनी कार्यवाही केली असून अशाच प्रकारची कारवाही राज्यभराटी ठिकाणी भाजपा (BJP) नेत्यांच्या कार्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर केली जात आहे. (BJP)
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवार, 21 मार्च रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळ्याशी (Delhi Liquor Scam) संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली. तत्पूर्वी, दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने या प्रकरणात या टप्प्यावर केजरीवाल यांना दंडात्मक कारवाईपासून अंतरिम संरक्षण देणारा आदेश पारित करण्यास नकार दिला. त्यामुळे दिल्लीतील सुरक्षाव्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. (BJP)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.