- ऋजुता लुकतुके
आयपीएल (IPL 2024) स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्स फ्रँचाईजीला (Rajasthan Royals franchise) एक मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा लेगस्पिनर ॲडम झुंपाने (Adam Zampa) या हंगामातून माघार घेतली आहे. यंदाच्या हंगामासाठी झुम्पाला राजस्थान संघाने दीड कोटी रुपये देऊन आपल्याकडे कायम राखलं होतं. राजस्थान संघाकडे अश्विन, यजुवेंद्र चहल (Yajuvendra Chahal) आणि ॲडम झुम्पा (Adam Zampa) असं तगडं फिरकीचं त्रिकुट होतं. यातील झुम्पा गेल्यावर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील सगळ्यात यशस्वी फिरकी गोलंदाज ठरला होता. आता ॲडम झुम्पाच्या जागी राजस्थान संघाने मुंबईच्या तनुष कोटियनचा संघात समावेश केला आहे. तनुष यंदाच्या रणजी हंगामातील सगळ्यात यशस्वी गोलंदाज आहे. (IPL 2024)
(हेही वाचा- सांगलीतील UBT उमेदवाराची घोषणा राहुल गांधींच्या सहमतीनेच; संजय राऊत काय म्हणाले ?)
पण, ऐनवेळी त्याने लीगमधून माघार घेतली आहे. गेल्या हंगामातही झुम्पा राजस्थान संघासाठी सहाच सामने खेळला होता. आणि यात त्याने २३.८ च्या सरासरीने ८ बळी घेतले होते. २२ धावांत ३ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. चेन्नई सुपरिकिंग्ज विरुद्ध ही कामगिरी त्याने केली होती. (IPL 2024)
तर एकदिवसीय विश्वचषकात भारतीय वातावरणात तो २२ बळींसह सर्वात यशस्वी फिरकीपटू ठरला होता. (IPL 2024)
Big blow for Rajasthan Royals! Adam Zampa pulls out of the IPL 2024https://t.co/eP5X5vT8g3
— Cricket Addictor (@AddictorCricket) March 21, 2024
यंदा आयपीएल नंतर ऑस्ट्रेलियन (Australian) राष्ट्रीय संघाचा कार्यक्रम व्यस्त असणार आहे. टी-२० विश्वचषकाबरोबरच भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. आणि त्या दरम्यान भारतीय संघ ५ कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकेवर झुम्पाला लक्ष केंद्रीत करायचं आहे. (IPL 2024)
(हेही वाचा- NIA : जागतिक दहशतवाद्यांमध्ये बोरिवली-पडघाची ओळख आहे इस्लामिक राष्ट्र; NIAच्या आरोपपत्रात गंभीर खुलासे)
ॲडम झुम्पाच्या (Adam Zampa) माघारीमुळे राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals franchise) संघाला दुहेरी फटका बसला आहे. कारण, आधीच मुख्य तेज गोलंदाज प्रसिध कृष्णा दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीए. त्यातच फॉर्ममध्ये असलेला ॲडम झुम्पाच्या माघारीमुळे गोलंदाजीतला संघाचा अनुभव कमी झाला आहे. (IPL 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community