सांगलीतील UBT उमेदवाराची घोषणा राहुल गांधींच्या सहमतीनेच; संजय राऊत काय म्हणाले ?

सांगली लोकसभा मतदारसंघ या काँग्रेसच्या मजबूत किल्ल्याला २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने खिंडार पाडलं. १९६२ ते २०१४ पर्यंत या मतदारसंघातून नेहमी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता.

209
सांगलीतील UBT उमेदवाराची घोषणा राहुल गांधींच्या सहमतीनेच; संजय राऊत काय म्हणाले ?

सांगली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे (UBT) डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगली मिरज येथे गुरुवारी जाहीर सभेत केली. ठाकरेंच्या या घोषणेमुळे सांगलीची जागा लढविण्याचा निर्धार केलेल्या कॉंग्रेसला धक्का बसला असे असले तरी हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या समोर मुंबईत झालेल्या चर्चेनंतरच झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. (UBT)

मिरज वैद्यकीय महाविद्यालयाजवळ कोळेकर मठ येथे ठाकरे यांची सभा झाली. सुमारे ३२ मिनिटांच्या भाषणात ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींवर कडाडून टीका केली. (UBT)

काळजी नको, एकत्र जाऊ

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या स्मृतिस्थळाचे गुरुवारी दर्शन घेऊन अभिवादन केले. त्यावेळी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा व विशाल पाटील यांच्या मातोश्री शैलजा पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ठाकरे यांनी काळजी करू नका, एकत्र जाऊ, असे आश्वासन त्यांना दिले. (UBT)

सांगली लोकसभा मतदारसंघ या काँग्रेसच्या मजबूत किल्ल्याला २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने खिंडार पाडलं. १९६२ ते २०१४ पर्यंत या मतदारसंघातून नेहमी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. वसंतदादाचे पुत्र प्रकाशबापू पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाचे पाच वेळा नेतृत्व केलं. त्यांच्या निधनानंतर प्रतीक पाटील २००६ ला झालेल्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. २००९ ला प्रतीक यांनी पुन्हा विजय मिळवला, पण २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजयकाका पाटील यांनी ऐन लोकसभेवेळी भाजपामध्ये प्रवेश केला. २०१४ च्या मोदी लाटेत संजयकाका पाटील यांनी प्रतीक पाटील यांचा पराभव केला आणि पहिल्यांदा काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. (UBT)

(हेही वाचा – Mamata Banerjee : केजरीवालांच्या अटकेनंतर भाजपाचा ममतांना इशारा; लवकरच होणार अटक ?)

सांगलीच्या उमेदवारीवरून काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये पेच

गुरुवारी सांगली मिरज मध्ये झालेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सभेच्या दरम्यान त्यांनी आपला उमेदवार जाहीर केल्यामुळे स्थानिक काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी नाराज असल्याने त्यांनी आपली नाराजी राज्यातील पक्षश्रेष्ठी तसेच दिल्लीश्वरांपर्यंत पोहोचवली आहे. त्यातच नाना पटोले यांनी सांगलीचा उमेदवार परस्पर जाहीर केल्याने आपली नाराजी बोलून दाखवल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी याचा निर्णय आपण दिल्लीतच घेऊ असे सारवा सारव करण्याचे उत्तर दिले. (UBT)

शिवसेना फुटीनंतर पश्चिम महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना फारसे स्थान नसल्याकारणानेच तसेच कोल्हापूरची निवडून आलेली शिवसेनेची जागा ही काँग्रेसला दिल्यामुळे आपण सांगलीची जागा घेऊन पश्चिम महाराष्ट्रात आपल्यासाठी काहीतरी असावं हाच या मागचा उद्देश असल्याचा संजय राऊत यांनी बोलून दाखवले. (UBT)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.