मुंबई महापालिकेच्या (BMC) आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतात भूषण गगराणी यांनी आपल्या कामकाजाची दिशा स्पष्ट केली. सकाळी नऊ वाजल्यापासूनच आपण मुख्यालयात हजर होऊन कामाला सुरुवात करणार असे त्यांनी जाहीर करून टाकत असा संदेश आयुक्त कार्यालयातील कर्मचारी वृंदाला देत आपणही सकाळी ठीक नऊ वाजताच उपस्थित राहावेत अशा प्रकारच्या सूचना त्यांनी दिल्याची माहिती मिळत आहेत. गगराणी यांच्या पावलावर पाऊल ठेवतच अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी आपण आठवड्याचे सातही दिवस काम करणार असल्याचा निर्धार पक्का केला. त्यामुळे माझ्या सोबत तुम्हालाही उपस्थित रहावे लागेल अशा प्रकारचे निर्देश आपल्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांना दिले आहेत. एवढेच नाही तर आपल्याला भेटायला येणारा प्रत्येक व्यक्ती तथा अधिकारी वर्ग यांच्यावर आपला लक्ष राहावा याकरिता आपल्या कार्यालयासह इतर परिसरात सीसीटीव्ही लावण्याचे ही निर्देश त्यांनी प्रशासनाला दिल्याची माहिती मिळत आहे. (BMC)
महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्यासह अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी यांनी महापालिका मुख्यालयात जात आपल्या पदाचा भार बुधवारी स्वीकारला. त्यानंतर गगराणी यांनी पहिल्याच दिवशी आपण सकाळी नऊ वाजल्यापासूनच कार्यालयात उपस्थित राहणार असून मला त्याच वेळेत कर्मचारी वर्ग उपस्थित हवा आहे. कुणी कसे उपस्थित राहायचे याचे नियोजन आपण करावे अशा प्रकारचे निर्देश यांनी दिले होते. मात्र पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या दिवशी सकाळी नऊ वाजता न पोहोचता साडेनऊ वाजल्यानंतर गगराणी हे कार्यालयात पोहोचले. मात्र पहिल्याच दिवशी ते लेट लतिफ ठरले. (BMC)
(हेही वाचा – NIA : जागतिक दहशतवाद्यांमध्ये बोरिवली-पडघाची ओळख आहे इस्लामिक राष्ट्र; NIAच्या आरोपपत्रात गंभीर खुलासे)
मात्र, दुसरीकडे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी आपल्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर लक्ष रहावे याकरिता आपल्या कार्यालयात आणि परिसरात सीसीटीव्ही (CCTV) लावण्याचे निर्देश देण्याची माहिती मिळत आहेत. हे सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागात तातडीने सीसीटीव्ही बसवण्याचे सूचना केल्या आहेत. आपल कार्यालयीन कर्मचारी हा मोबाईलमध्ये व्यस्त असतो का किंवा काय याबाबतची याबाबत आपल्याला न्याय याबरोबरच आपल्याला भेटण्यास येणाऱ्या व्यक्तींची आपल्याला माहिती व्हावी व ओळख पटावी या करता सीसीटीव्ही (CCTV) लावण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र, महापालिकेत (BMC) कार्यालयीन वेळेतच कामकाज न करता बांगर यांनी आपण आठवड्याचे सातही दिवस काम करणार असल्याचे जाहीर करून टाकले आणि कर्मचारी वृंदांना आपल्या सोबत उपस्थित राहावं लागेल अशा प्रकारचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आठवड्याचे दोन दिवस सुट्टीची सवय लागली आहे. त्या कर्मचाऱ्यांना आता सातही दिवस यावे लागणार असून त्यांना त्याप्रमाणे नियोजन करावे लागेल. त्यामुळे भूषण गगराणी आणि त्यांच्या पाठोपाठ बांगर यांनी कर्मचाऱ्यांना शिस्तीच्या दृष्टिकोनातून उचलेल्या या पावलाची महापालिकेत एकच चर्चेचा विषय ठरलेला आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community