Lavasa Project : शरद पवारांचा लवासा प्रकल्प विकत घेणारी कंपनी EDच्या रडारवर

दिवाळखोरीत निघालेला लवासा प्रकल्प अजय सिंग यांच्या डार्विन कंपनीने विकत घेतला होता.

319

शरद पवार यांचे पुण्यातील पहिले हिल स्टेशन लवासा (Lavasa Project) अडचणीत सापडले आहे. एकेकाळी हा प्रकल्प खूपच चर्चेत आला होता. आता हा प्रकल्प पुन्हा चर्चेत आला आहे. हा प्रकल्प विकत घेणाऱ्या कंपनीसमोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत. या कंपनीच्या दिल्ली, मुंबई, गोव्यात अशा नऊ ठिकाणी कंपनीचे कार्यालय आणि इतर ठिकाणी EDने धाडी टाकल्या. या धाडीत ७८ लाखांची रोकड आणि २ लाख रुपयांची विदेशी रकम जप्त करण्यात आली आहे.

(हेही वाचा NIA : जागतिक दहशतवाद्यांमध्ये बोरिवली-पडघाची ओळख आहे इस्लामिक राष्ट्र; NIAच्या आरोपपत्रात गंभीर खुलासे)

प्रकल्प दिवाळखोरीत निघाल्याने लिलाव 

दिवाळखोरीत निघालेला लवासा प्रकल्प (Lavasa Project) अजय सिंग यांच्या डार्विन कंपनीने विकत घेतला होता. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात लवासा प्रकल्प उभारण्यात आला आहे. १२ हजार ५०० एकर जमिनीवर देशातील पहिला खासगी हिल स्टेशन उभारण्यात आले आहे. हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीकडून उभारण्यात येणारा हा प्रकल्प अडचणीत आला. त्यानंतर हा प्रकल्प घेण्यासाठी डार्विन कंपनी पुढे आली. मुंबईतील डार्विन ग्रुपने लवासा घेण्यासाठी १,८१४ कोटी रुपयांची बोली लावली. परंतु हा प्रकल्प दिवाळखोरीत गेला असल्यामुळे त्याला एनसीएलटीची (नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल) मंजुरी हवी होती. एमसीएलटीने मंजुरी दिल्यानंतर डार्विन ग्रुपने हा प्रकल्प जुलै २०२३ मध्ये घेतला. या प्रकल्पाचा (Lavasa Project)  व्यवहार झाल्यानंतर डार्विन ग्रुप आठ वर्षात १ हजार ८१४ कोटी रुपयांची भरपाई बँक आणि घरे घेणाऱ्यांना देणार आहे. बँकांची ९२९ कोटी रुपये थकबाकी आहे. तसेच घर खरेदी करणाऱ्या लोकांना ४३८ कोटी रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.