Veer Savarkar Movie: स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दणक्यात एंट्री!

या चित्रपटामुळे रणदीप हुड्डा यांनी पुन्हा एकदा आपल्या अभिनयाच्या ताकदीने वीर सावरकर हे ऐतिहासिक पात्र उत्तमरित्या साकारलं आहे.

2365
Veer Savarkar Movie: स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दणक्यात एंट्री!

रणदीप हुड्डा यांचा बहुप्रतीक्षित ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट (Veer Savarkar Movie) विनायक दामोदर सावरकर उपाख्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील बायोपिक असून २२ मार्च २०२४ रोजी रुपेरी पडद्यावर दाखल झाला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर ४ मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरने समाजातील सर्व घटकांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी या चित्रपटातलं सावरकरांवरील एक रॅप सॉंग प्रदर्शित झालं होतं आणि तरुणांना हे गाणं खूपच आवडलं. अनेक लोकांनी हे गाणं पाहून सावरकरांवर अशा प्रकारचं गाणं तयार होऊ शकतं, याविषयी कौतुक केलं. त्याचबरोबर रणदीप हुड्डा यांनी इन्स्टाग्रामवर एक छायाचित्र शेअर केलं आहे. ज्यात त्यांनी काळ्या पाण्याच्या प्रसंगासाठी आपलं वजन लक्षणीयरित्या कमी केलं होतं. या छायाचित्रानेही लोकांचं लक्ष वेधून घेतलं.

या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून २१ मार्चला सेन्सॉर सर्टिफिकेट मिळालं आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. काही ठिकाणी गुरुवारी चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आणि विशेष म्हणजे या दिवशीही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अगदी रात्री ११.५५ चा शो बघायलाही लोक येत होते, ही लक्षणीय बाब आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Randeep Hooda (@randeephooda)


(हेही वाचा – IPL 2024 : राजस्थान रॉयल्सला आयपीएलपूर्वी धक्का, ‘या’ फिरकीपटूने घेतली माघार )

चित्रपटाचं वैशिष्ट्य…
या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेते रणदीप हुड्डा यांनी केले आहे आणि आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि लिजेंड स्टुडिओज यांनी निर्मिती केली होती. यात रणदीप हुड्डा आणि अंकिता लोखंडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे ऐतिहासिक पात्रांसाठी अभिनेत्यांनी निवड आणि त्यांचा मेकअप. अमित सियाल, रसेल जेफ्री बँक्स, राजेश खेरा, ब्रिजेश मित्तल, लोकेश झा आणि मार्क बेनिंग्टन यांनीदेखील इतर भूमिका सक्षमपणे साकारल्या आहेत.

सशक्त अभिनय व दिग्दर्शन, प्रभावी संवाद
या चित्रपटामुळे रणदीप हुड्डा यांनी पुन्हा एकदा आपल्या अभिनयाच्या ताकदीने वीर सावरकर हे ऐतिहासिक पात्र उत्तमरित्या साकारलं आहे. रणदीप हुड्डा यांचा सशक्त अभिनय व दिग्दर्शन, प्रभावी संवाद आणि व्हिज्युअल्समुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करेल, अशी अपेक्षा आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.