दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal Arrest) यांना गुरुवारी, २१ मार्च रोजी रात्री उशिरा ईडीने अटक केली. अरविंद केजरीवाल यांना अटकपूर्व जामीन देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर ईडीने तत्काळ कारवाई करून त्यांना अटक केली. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे.
सक्तवसुली संचलनालयाने दिल्लीतील मद्य गैरव्यवहारप्रकरणी गुरुवारी रात्री आम आदमी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal Arrest) यांना अटक केली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्रीपदावर असताना अटक करण्यात आलेले केजरीवाल हे पहिलेच नेते आहेत. अटकेपासून संरक्षण देण्याची केजरीवाल यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर गुरुवारी ईडीच्या पथकाने केजरीवाल यांच्या निवासस्थानाची झडती घेतली आणि रात्री त्यांना अटक केली. त्यांना आज शुक्रवारी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. ईडीने यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या दहा दिवसांच्या कोठडीची मागणी केली आहे.
Join Our WhatsApp Community