IPL 2024 Opening Ceremony : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात क्रिकेट आणि बॉलिवूडचं फ्युजन 

IPL 2024 Opening Ceremony : अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, ए आर रेहमान आणि सोनू निगमच्या कार्यक्रमांची बहार 

183
IPL 2024 Opening Ceremony : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात क्रिकेट आणि बॉलिवूडचं फ्युजन 
IPL 2024 Opening Ceremony : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात क्रिकेट आणि बॉलिवूडचं फ्युजन 
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलमधील टी-२० क्रिकेटला मनोरंजनाचा तडका हा तसाही मिळालेला आहेच. पण, उद्घाटनाच्या समारंभात तो नेहमी अधोरेखित होतो. आताही २०२४ च्या हंगामाची सुरुवातच स्टेजवर अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांच्या एंट्रीने झाली. दोघांचा बडे मियाँ, छोटे मियाँ हा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. आणि त्याचंच प्रमोशन दोघांनी आयपीएलच्या निमित्ताने केलं. दोघांनी या सिनेमातील गाण्यावर ठेका धरला. आणि पहिल्या सामन्यातील संघांचे कर्णधार ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad) आणि फाप दू प्लेसिस (Faf du Plessis) यांनाही सोबत थिरकायला लावलं. (IPL 2024 Opening Ceremony)

(हेही वाचा- स्वातंत्र्य चळवळीत ‘हमारा संग्राम’ नावाचे साप्ताहिक संपादित करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक Subhadra Joshi)

अक्षय कुमारने आपल्या भुलभुलैय्या आणि देसी बॉय्ज या सिनेमातील गाण्यांवरही नृत्य केलं. त्याची एक झलक पाहूया, (IPL 2024 Opening Ceremony)

आपल्या सादरीकरणानंतर अक्षयने मैदानावर एक फेरी मारली. आणि लोकांच्या अभिनंदनाचा स्वीकार केला. यावेळी अक्षयबरोबर बाईकवर टायगर श्रॉफ बसला होता. दोघांनी मैदानाची एक चक्कर मारली. आणि सोबतीला गाणं सुरू होतं ते, ‘सबसे आगे होंगे हिंदुस्थानी.’  यानंतर स्टेजचा ताबा घेतला तो बॉलिवूड गायक सोनू निगम (Sonu Nigam) यांनी. त्यांनी सुरुवातीला वंदे मातरम हे देशभक्तीपर गीत सादर केलं. त्यानंतर वणक्कम चेन्नई म्हणत स्टेजवर अवतरले चेन्नईचे प्रसिद्ध संगीतकार ए आर रेहमान. (IPL 2024 Opening Ceremony)

(हेही वाचा- World Water Day: भूगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज तलाव स्वच्छता अभियानाचे आयोजन)

ए आर रेहमान (AR Rehman) यांनी मोहीत चौहानच्या साथीने माँ तुझे सलाम या गाण्याबरोबरच रजनीकांतच्या सिनेमातील ब्लॉकबस्टर गाणं बल्ले लाकाही सादर केलं. टायगर श्रॉफच्या त्या नंतरच्या सोलो सादरीकरणालाही प्रेक्षकांनी दाद दिली. (IPL 2024 Opening Ceremony)

(हेही वाचा- गयाना देशाचे पहिले भारतीय पंतप्रधान Cheddi Jagan)

तर कार्यक्रमाचा शेवट झाला तो ए आर रेहमान यांच्या जय हो या ऑस्कर विजेत्या गाण्याने. (IPL 2024 Opening Ceremony)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.