Table Tennis News : साथीयन गुणशेखरन टेबलटेनिस विश्वविजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय 

Table Tennis News : लेबेनॉनच्या बिरुतमध्ये झालेली डब्ल्यूटीटी फिडर स्पर्धा साथीयनने जिंकली आहे 

184
Table Tennis News : साथीयन गुणशेखरन टेबलटेनिस विश्वविजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय 
Table Tennis News : साथीयन गुणशेखरन टेबलटेनिस विश्वविजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय 
  • ऋजुता लुकतुके

भारताचा स्टार टेबलटेनिसपटू साथीयन गुणशेखरनने ऐतिहासिक टप्पा गाठताना जागतिक टेबल टेनिस (World Table Tennis) संघटनेची फिडर स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केली आहे. विश्वविजेतेपद स्तराची ही स्पर्धा जिंकणारा साथीयन हा पहिला भारतीय आहे. लेबेननची राजधानी बिरुतमध्ये झालेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत त्याने भारतीय खेळाडू मानव ठक्करचा ३-१ ने पराभव केला. (Table Tennis News)

(हेही वाचा- PM Narendra Modi : भारत आणि भूतान यांच्यात सामंजस्य करारांची देवाणघेवाण; दोन्ही पंतप्रधानांमध्ये द्विपक्षीय बैठक)

या स्पर्धेत साथीयनला अकरावं मानांकन मिळालं होतं. पण, अंतिम फेरीत धडक देताना त्याने पाचवा मानांकित हरमित देसाई (Harmit Desai) आणि अव्वल मानांकित चाँग-ची-युआन (Chong- Chi-Yuan) यांचा धक्कादायक पराभव केला. विशेष म्हणजे हे दोन्ही सामने त्याने सलग तीन गेममध्ये जिंकले. (Table Tennis News)

अंतिम सामना त्याच्यासाठी महत्त्वाचा होता. आणि त्याची गाठ नववा मानांकित भारताचा मानव ठक्करशी होती. या सामन्यात पहिला गेम हरल्यानंतरही त्याने या सामन्यात बाजी मारली. अंतिम गुण फलक होता ६-११, ११-७, ११-७ आणि ११-४ असा साथीयनच्या बाजूने. (Table Tennis News)

यापूर्वी २०११ मध्ये साथीयनने झेक रिपब्लिकमध्ये (Czech Republic) झालेली आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर त्याचं हे दुसरं आंतरराष्ट्रीय विजेतेपद. आणि जागतिक टेबल टेनिस असोसिएशनच्या स्पर्धेतील हे पहिलंच विजेतेपद. (Table Tennis News)

(हेही वाचा- Mahua Moitra सीबीआयच्या रडारवर, अनेक ठिकाणी छापे सुरू)

भारताला या स्पर्धेत आणखी एक विजेतेपद मिळालं ते मिश्र दुहेरीत. दिया चितळे आणि मनुष शाह यांनी मानव आणि अर्चना कामत यांचा पराभव केला. तर पुरुषांच्या दुहेरीत मानव ठक्कर आणि मनुष शाह यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. (Table Tennis News)

हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.