India Maldives : मालदीव पुन्हा नरमला; कर्जमुक्ती करता मागितली भारताची साथ

भारत गेल्या काही वर्षांपासून मालदीवच्या जनतेला दोन हेलिकॉप्टर्स आणि एक डॉर्नियर विमानाद्वारे मानवतावादी आणि वैद्यकीय सेवा पुरवत आहे. पुढच्या महिन्यात मालदीवमध्ये संसदीय निवडणुका होणार असताना मुइझूचे हे विधान आले आहे.

237
India Maldives : मालदीव पुन्हा नरमला; कर्जमुक्ती करता मागितली भारताची साथ

मालदीवने (India Maldives) पुन्हा एकदा नरमाईचा सूर आवळला आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांनी भारताचा उल्लेख ‘जवळचा मित्र’ असा केला आहे. तसेच कर्ज माफीचे आवाहन केले आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून चीन समर्थक मोहम्मद मुइझू भारतविरोधी मोहीम राबवत आहेत. पण आता ते बदलताना दिसत आहेत. नरमाईची भूमिका घेत, मुइझूने भारताचे आपले जवळचे सहकारी म्हणून वर्णन केले आणि भारत सरकारला (India Maldives) कर्ज माफी देण्याचे आवाहन केले.

(हेही वाचा – Mahua Moitra सीबीआयच्या रडारवर, अनेक ठिकाणी छापे सुरू)

मालदीवला मदत करण्यात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली :

खरे तर, गेल्या वर्षीच्या अखेरपर्यंत मालदीववर (India Maldives) भारताचे ४०.९ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे कर्ज होते. पण सत्तेवर आल्यानंतर मुइझूने भारतासाठी कठोर भूमिका घेतली. आपल्या मुलाखतीत मुइझू म्हणाले की, मालदीवला मदत करण्यात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली आणि मोठ्या संख्येने प्रकल्प राबवले.

निवडणुकांपूर्वी मुइझू यांची नरमाईची भूमिका :

मुइझू पुढे म्हणाले की, भारत गेल्या काही वर्षांपासून मालदीवच्या (India Maldives) जनतेला दोन हेलिकॉप्टर्स आणि एक डॉर्नियर विमानाद्वारे मानवतावादी आणि वैद्यकीय सेवा पुरवत आहे. पुढच्या महिन्यात मालदीवमध्ये संसदीय निवडणुका होणार असताना मुइझूचे हे विधान आले आहे.

(हेही वाचा – Lok Sabha election 2024 : माधव मधील “ध” गळाल्याने महायुतीला फटका)

ते भारताविषयी काय म्हणाले?

तसेच मुइझू (India Maldives) यांनी असा दावा केला की मी अशी कोणतीही पावले उचलली नाहीत ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले जातील. मालदीवमधील भारतीय लष्कराच्या समस्येवर वाटाघाटीद्वारे तोडगा काढण्यासाठी त्यांचे सरकार काम करत आहे. (India Maldives)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.