National Sports Day : राष्ट्रीय क्रीडा दिवसाची सुरुवात कशी झाली?

मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवस हा देशात क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.

363
National Sports Day : राष्ट्रीय क्रीडा दिवसाची सुरुवात कशी झाली?
National Sports Day : राष्ट्रीय क्रीडा दिवसाची सुरुवात कशी झाली?
  • ऋजुता लुकतुके

२९ ऑगस्ट हा दिवस देशात राष्ट्रीय क्रीडा दिवस (National Sports Day) म्हणून साजरा केला जातो. भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांचा हा जन्मदिवस आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठीच या दिवसाची निवड करण्यात आली आहे. देशाच्या प्रगतीत क्रीडापटूंनी दिलेलं योगदान, खेळातून निर्माण होणारी ऊर्जा आणि क्रीडापटूंचं समाजासाठी योगदान यांचा सन्मान या दिवशी केला जातो. २०१२ मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय क्रीडा दिवस (National Sports Day) पाळण्यात आला.

राष्ट्रीय क्रीडा दिवसाची संकल्पना

क्रीडा दिवसाची संकल्पना साकारण्याला आता १३ वर्षं उलटून गेली. दरवर्षी देशभरातील कार्यक्रमांसाठी एक मध्यवर्ती कल्पना मांडण्यात येते. आणि देशभरात त्यावर आधारित कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. २०२३ मध्ये मुख्य संकल्पना होती ती समाजाने तंदुरुस्त होणं आणि सर्वसमावेशक होणं.

मेजर ध्यानचंद हे भारताचे पहिले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्टार म्हणावे लागतील. स्वातंत्र्यपूर्व काळापासून हॉकीत त्यांचा दबदबा होता. आणि त्यांच्या खेळाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली गेली. त्यांच्याच काळात भारताने ऑलिम्पिकमध्ये ८ सुवर्ण पदकं मिळवली. त्यांना हॉकीचा जादूगार म्हटलं जायचं. त्यामुळे त्यांचाच वाढदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन (National Sports Day) म्हणून साजरा होणं हे स्वाभाविकच होतं.

(हेही वाचा – Radha Krishna Happy Holi : होळी हा सण राधा-कृष्णाच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक!)

ध्यानचंद भारतासाठी १४५ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. आणि यात त्यांनी तब्बल ४०० मैदानी गोल केले. १९२६ ते १९४८ या कालावधीत ते आंतरराष्ट्रीय हॉकी खेळले. आणि भारतीय हॉकीचाही हाच सुवर्णकाळ मानला जातो.

राष्ट्रीय क्रीडा दिवसाचं महत्त्व

तंदुरुस्ती आणि शारीरिक हालचालींचं आपल्या जीवनातील महत्त्व सांगणारा दिवस म्हणजे राष्ट्रीय क्रीडा दिन. त्याचबरोबर सकस समाजाचा एक महत्त्वाचा भाग आहे क्रीडा किंवा खेळ. खेळांना शहरापासून ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणं, समाजाच्या सर्व थरातील लोकांना खेळाच्या माध्यमातून एकत्र आणणं आणि देशात क्रीडा संस्कृती रुजवणं यासाठी देशभरात विविध कार्यक्रम भरवले जातात. आणि यातून क्रीडा जागृती घडवून आणली जाते.

तसंच खेळाडूंना सरावाची साधनं पुरवणं, आर्थिक मदत करणं आणि स्पर्धात्मक चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव असे उपक्रमही सरकार मार्फत हाती घेण्यात येतात.

शिवाय समाजाला शारीरिक तंदुरुस्तीचं महत्त्व सांगणं, सुदृढ जीवनशैलीकडे त्यांना वळवणं, समाजातील एकात्मता साध्य करणं हे ही क्रीडा दिवस पाळण्याचे हेतू आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.