Sports Bike Under 2 Lakhs : ‘या’ स्पोर्ट्स बाईक आहेत ताकदीने सर्वोत्तम आणि किमतीने किफायतशीर

तुम्हाला तगडा परफॉर्मन्स आणि किफायतशीर किंमत हवी असेल तर हे पाच पर्याय तुम्ही पाहू शकता. 

239
Sports Bike Under 2 Lakhs : ‘या’ स्पोर्ट्स बाईक आहेत ताकदीने सर्वोत्तम आणि किमतीने किफायतशीर
  • ऋजुता लुकतुके

स्पोर्ट्स बाईक हा तरुणाईचा जिव्हाळ्याचा विषय आहे. हाय परफॉर्मन्स म्हणजे दणदणीत कामगिरी ही बाईक घेण्याचा निकष असला तरी ग्राहकांची नजर चांगल्या किमतीवरही असेल. आणि बाईकच्या लूकवरही असते. तिच्या डिझाईनवर असते. हिंदुस्थान पोस्टच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी २ लाख रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या ५ आघाडीच्या स्पोर्ट्स बाईकची माहिती करून देणार आहोत. यामाहा, रॉयल एनफिल्ड, टीव्हीएस आणि बजाज असे पर्याय तुम्हाला यात उपलब्ध आहेत. (Sports Bike Under 2 Lakhs)

यामाहा R15 V4

या बाईकची किंमत भारतात १.८२ ते १.९७ लाख रुपयांच्या दरम्यान आहे. गाडीचं इंजिन १५५ सीसी क्षमतेचं आहे. आणि एका लीटरमध्ये ६६ किमी इतकं अंतर ती कापू शकते. पूर्ण क्षमतेनं चालत असेल तेव्हा ही बाईक १८.४ पीएस इतकी ताकद निर्माण करते. तरुणाईला आवडेल अशा लूक बरोबरच बाईकमध्ये ११ लीटरची इंधनाची टाकी तसंच ६ स्पीड गिअर बॉक्स आहे. (Sports Bike Under 2 Lakhs)

(हेही वाचा – Balaji Mandir Pune : पुण्याच्या बालाजी मंदिराला भेट देताय? तर योग्य मार्गदर्शनासाठी हा लेख जरुर वाचा!)

रॉयल एनफिल्ड बुलेट ३५०

रॉयल एनफिल्ड या ब्रँड विषयी वेगळं सांगायला नको. बुलेट हा आपला जुना ब्रँड कंपनीने नवीन रुपात लोकांसमोर पुन्हा एकदा आणला आहे. आणि त्याला लोकांची पसंतीही मिळतेय. पारंपरिक एनफिल्ड बुलेटचा लुक असलेली ही बाईक १.७३ लाखापासून सुरू होते. आणि तिचं सगळ्यात वरचं मॉडेल २.१५ लाख रुपयांपर्यंत जातं. तब्बल ३४९ सीसी इतक्या क्षमतेचं बाईकचं इंजिन आहे. एका लीटरला ३७ किमी अंतर ती कापू शकते. गाडीत १३ लीटरची इंधनाची टाकी आहे. आणि गाडीचा गिअर बॉक्स ५ स्पीडचा आहे. रॉयल एनफिल्डची क्लासिक श्रेणीही १.९३ लाखांपासून सुरू होते. (Sports Bike Under 2 Lakhs)

टीव्हीएस अपाचे RTR 160 4V

टीव्हीएस अपाचे बाईकचा लुक हा तरुणांमध्ये खास लोकप्रिय आहे. शिवाय गाडीचे लाल आणि भडक निळा हे रंगही ग्राहकांना आवडतात. टीव्हीएस अपाचे आरटीआर १६० ही बाईक भारतात १.२३ ते १.४५ लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच कामगिरी, लुक आणि किमतीच्या मानाने हा एक चांगला पर्याय तुमच्यासमोर आहे. १६४ सीसी क्षमतेचं इंजिन या बाईकमध्ये आहे. तर एका लीटरमध्ये ही बाईक ४९ किमीपर्यंत जाते. गाडीचा सर्वाधिक वेग हा १२० किमी प्रतीतास इतका आहे. गाडीचा गिअर बॉक्स ५ स्पीडचा आहे. (Sports Bike Under 2 Lakhs)

(हेही वाचा – Maratha Reservation : सरकार मराठा आंदोलकांवरील किती गुन्हे घेणार मागे? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती)

बजाज पल्सर NS200

बजाज पल्सर एनएस२०० या बाईकची किंमत भारतात १.५७ लाखांपासून सुरू होते. १९९ सीसी क्षमतेचं इंजिन यात आहे. आणि पूर्ण क्षमतेनं सुरू असताना १८.४ पीएस इतकी ताकद ती निर्माण करू शकते. एका लीटरमध्ये ती ४९ किमीपर्यंतचं अंतर कापू शकते. तर बाईकमधील पेट्रोलची टाकी १२ लीटर क्षमतेची आहे. गाडीचं वजन फक्त १५८ किलोंचं आहे. त्यामुळे कमी वजनात जास्तीत जास्त वेग गाठणं बाईकला शक्य होतं. बाईकमध्ये ६ स्पीडचा गिअरबॉक्स बसवण्यात आला आहे. (Sports Bike Under 2 Lakhs)

KTM ड्युक २००

एकट्या लुकच्या निकषावर तरुणाईला आवडणारी सर्वोत्तम बाईक कुठली हा प्रश्न विचारला तर उत्तर निर्विवादपणे केटीएम हे असेल. त्यातही ड्युक हा या कंपनीचा जागतिक स्तरावर लोकप्रिय ब्रँड आहे. केटीएम ड्युक २०० ही बाईक भारतातही उपलब्ध आहे. पण, तिची किंमतच सुरू होते १.९६ लाख रुपयांपासून. २०० सीसी क्षमतेची ही बाईक लाल, केशरी, जांभळ्या अशा रंगांत उपलब्ध आहे. पूर्ण क्षमतेनं सुरू असेल तेव्हा तब्बल २५ पीएस इतकी ताकद ही बाईक निर्माण करू शकते. एका लीटरमध्ये ३३ किमी हे अंतरही गाडीच्या इंजिनच्या मानाने कमी नाहीए. शिवाय गाडीत ६ स्पीडचा गिअर बॉक्सही आहे. (Sports Bike Under 2 Lakhs)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.