होळी आणि धूलिवंदनासाठी ठाणे आयुक्तालयाच्या ५ परिमंडळात २ हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे; तर धूलिवंदनाच्या दिवशी ठाणे वाहतूक विभागाचे ७०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात असतील. दारू किंवा इतर अमली पदार्थांची नशा करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.
रविवारी होळी आणि सोमवारी धूलिवंदन असल्याने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या विद्यमाने मोठा फौजफाटा पाच परिमंडळात तैनात करण्यात येणार आहे. त्यातच केमिकलयुक्त फुगे मारण्याचे प्रकार घडल्यास कायदेशीर कारवाईचे संकेत ठाणे पोलिसांनी दिले आहेत. या विशेष कारवाईला शनिवार (२३ मार्च) पासून सुरू होणार आहे; तर सोमवारी (२५मार्च) सायंकाळपर्यंत कारवाई सुरू राहण्याचे संकेत आहेत. पाचही परिमंडळात नाकाबंदीच्या ठिकाणी वाहतूक पोलीस ब्रेथ एनालायझर मशीनद्वारे तपासणी करणार आहेत. या वाहतूक पोलिसांच्या विशेष कारवाईसाठी जवळपास ६३ पोलिस अधिकारी आणि ६५० पोलिस कर्मचारी तैनात राहणार आहेत.
(हेही वाचा – Sports Bike Under 2 Lakhs : ‘या’ स्पोर्ट्स बाईक आहेत ताकदीने सर्वोत्तम आणि किमतीने किफायतशीर)
रेल्वे पोलीसही सतर्क
रेल्वे रुळालगत असलेल्या झोपडपट्ट्यांमधून रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर जल्लोषात फुगे भिरकावल्याने अप्रिय घटना घडू शकतात. या घटना टाळण्यासाठी रेल्वे पोलीस वस्त्यांमधून जनजागृती करीत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community