भ्रष्टाचार प्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने (India German Embassy Summons) केलेल्या टिप्पणीवर भारताने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. केंद्र सरकारने शनिवारी (२३ मार्च) जर्मन दूतावासाचे उपप्रमुख जॉर्ज एन्झ्वेलर यांना समन्स बजावले. त्यानंतर जॉर्ज एन्झ्वेलर यांनी शनिवारी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.
(हेही वाचा – Arvind Kejriwal यांनी कोठडीतून लिहले पत्र; म्हणाले…)
नेमकं प्रकरण काय ?
दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर यासंदर्भात जर्मन दुतावासाने (India German Embassy Summons) भाष्य केले होते. जर्मन दुतावास म्हणाले होते की, आम्ही या प्रकरणाची दखल घेतली आहे. भारत हा लोकशाही असलेला देश आहे. आम्हाला आशा आहे की, न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याशी संबंधित सर्व मानके आणि लोकशाहीची मूलभूत तत्त्वे या प्रकरणातही लागू होतील. केजरीवाल यांना निष्पक्ष सुनावणीचा पूर्ण अधिकार आहे. ते कोणत्याही निर्बंधांशिवाय सर्व उपलब्ध कायदेशीर मार्गांचा वापर करू शकतात असं जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते. (India German Embassy Summons)
(हेही वाचा – Teachers Dress Code : शिक्षकांची ड्रेस कोड संहिता रद्द करावी; महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी)
भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप केल्याबद्दल तीव्र निषेध :
या अनावश्यक विधानानंतर भारताने जर्मनीचे राजदूत जॉर्ज एन्झ्वेलर यांच्याकडे भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप केल्याबद्दल तीव्र निषेध नोंदवला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जर्मन राजदूताकडे निषेध नोंदवला. तसेच जर्मन दुतावासाचे वक्तव्य म्हणजे भारताच्या न्यायालयीन प्रक्रियेतील हस्तक्षेप असल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (India German Embassy Summons) सांगितले की, आम्ही अशा अनावश्यक टिप्पण्यांना आमच्या न्यायिक प्रक्रियेत हस्तक्षेप करणे आणि आमच्या न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य कमी करण्याप्रमाणे पाहतो. भारत कायद्याचे शासन असलेला आणि मजबूत लोकशाही आहे. ज्या प्रकारे देश आणि जगात अन्य लोकशाही असलेल्या ठिकाणी सर्व कायदेशीर प्रकरणांमध्ये होते, या प्रकरणातही कायदा त्याच प्रमाणे आपले काम करेल. यासंबंधी पक्षपातपूर्ण धारणा अत्यंत चुकीच्या असल्याचे भारताने म्हंटले आहे. (India German Embassy Summons)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community