प्रसिद्ध लेखक विक्रम संपत यांच्या ‘वेटिंग फॉर शिवा’ या पुस्तकाचे पुण्यातील येरवडा येथे शुक्रवार, २२ मार्चला प्रकाशन करण्यात आले. शंखनाद करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी रुद्रस्तोत्र मंत्राने वातावरण अधिक चैतन्यमय झाले होते. विक्रम संपत, शेफाली वैद्य आणि जे. साईदीपक यांची उपस्थिती या प्रकाशन सोहळ्याला लाभली. (PUNE)
विक्रम संपत यांनी अवघ्या सहा महिन्यांत ‘वेटिंग फॉर शिवा’ हे पुस्तक लिहिले. यासाठी भगवान महादेवानेच त्यांना प्रेरणा दिली. त्यामुळे लेखक विक्रम संपत यांची महादेवा प्रति कृतज्ञता व्यक्त होत आहे. ‘वेटिंग फॉर शिवा’च्या निर्मितीदरम्यान विक्रम संपत यांच्या साहित्यिक प्रवासातील त्रिमूर्तीच्या प्रवचनास आदरांजली म्हणून ‘हर हर महादेव’, ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’ या घोषणा उत्साहाने देण्यात आल्या. त्यावेळी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.
(हेही वाचा – Swatantrya Veer Savarkar Film : स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचा बोलबाला; तीन दिवसात कमावले तब्बल इतके कोटी )
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाचा प्रचार करण्याचे आवाहन
याप्रसंगी डॉ. सचिन शशिकांत बोधानी यांनी विक्रम संपत आणि जे साईदीपक यांना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी लिहिलेले ‘Make Sure Gandhi is Dead’या पुस्तकाची प्रत भेट दिली. ज्यावर रणजित सावरकर यांची स्वाक्षरी आहे. यावेळी अभिनेते रणदीप हुड्डा यांच्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटाचा अधिकाधिक प्रचार-प्रसार करावा, असे आवाहनही बोधानी यांनी केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community