Court Pending Cases : अजूनही तारीख पे तारीखच; देशात ‘इतके’ कोटी खटले प्रलंबित

392
Court Pending Cases : अजूनही तारीख पे तारीखच; देशात 'इतके' कोटी खटले प्रलंबित
Court Pending Cases : अजूनही तारीख पे तारीखच; देशात 'इतके' कोटी खटले प्रलंबित

केंद्र सरकारने ‘नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रिड’च्या (National Judicial Data Grid) सहकार्याने अहवाल बनवला आहे. त्यानुसार ‘देशातील विविध न्यायालयांत ४ कोटी ४० लाख खटले प्रलंबित असून त्यांतील ९१ लाख ९१ हजार ६९३ खटले पोलिसांनी काम पूर्ण न केल्यामुळे प्रलंबित आहेत’, अशी माहिती समोर आली आहे. (Court Pending Cases)

(हेही वाचा – Swatantrya Veer Savarkar Film : स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचा बोलबाला; तीन दिवसात कमावले तब्बल इतके कोटी)

१८ लाख १७ हजार ७७१ खटल्यांशी संबंधित नोंदी गहाळ 

४ कोटी ४० लाख खटल्यांपैकी २ कोटी २१ लाख खटले ३ वर्षांपर्यंत जुने आहेत. उर्वरित खटले वेगवेगळ्या १५ कारणांमुळे प्रलंबित आहेत. या अडचणी दूर केल्यास २ कोटी १९ लाख खटले केवळ एका वर्षांत निकाली काढता येऊ शकणार आहेत. १८ लाख १७ हजार ७७१ खटल्यांशी संबंधित नोंदी पोलीस ठाणे आणि कनिष्ठ न्यायालय येथून गहाळ झाल्या आहेत. खटले वर्षानुवर्षे प्रलंबित राहिल्याने ते गहाळ झाल्याचे म्हटले जात आहे.

१० लाख १७ हजार खटले पुष्कळ वर्षे जुने आहेत. या खटल्यांशी संबंधित लोकांनी न्यायाची अपेक्षा सोडल्याने त्यांनी न्यायालयातच येणे बंद केले आहे. (Court Pending Cases)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.