मुत्थुस्वामी दीक्षितर यांचा जन्म २४ मार्च १७७६ साली तमिळनाडू येथील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामास्वामी दिक्षितर असं होतं. ते संगीतकार होते. त्यांनी मुत्थुस्वामी यांना कविता, संगीत, विज्ञान आणि खगोलशास्त्र अशा अनेक विषयांचं शिक्षण दिलं होतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या राहत्या गावातल्या सावकारांचा सल्ला ऐकून मुत्थुस्वामी हे मद्रासजवळच्या मनाली नावाच्या गावी आले. तिथे ते फोर्ट सेंट जॉर्ज या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पाश्चिमात्य संगीत, व्हायोलिन, ऑर्केस्ट्रा यांची ओळख करून घेतली. त्याच दरम्यान चिदंबरम योगी नावाच्या एका तपस्वी व्यक्तींनी मुत्थुस्वामी यांच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला. मुत्थुस्वामींना घेऊन ते योगी बनारस येथे गेले. (Muthuswami Dikshitar)
(हेही वाचा – Court Pending Cases : अजूनही तारीख पे तारीखच; देशात ‘इतके’ कोटी खटले प्रलंबित)
संगीत, दर्शनशास्त्र, गूढविद्या आणि योग या विषयांचा अभ्यास
तिथे गेल्यानंतर मुत्थुस्वामी यांनी संगीत, दर्शनशास्त्र, गूढविद्या आणि योग या सर्व विषयांचा सखोल अभ्यास केला. त्याबरोबरच भारतीय शास्त्रीय संगीताचाही त्यांनी अभ्यास केला. खास करून ध्रुपद शैलीवर त्यांची चांगली पकड होती. योगी चिदंबरम यांचं देहावसान झाल्यानंतर मुत्थुस्वामी हे पुन्हा दक्षिणेत आले. दक्षिणेत ते तिरुपती जवळच्या तिरुत्तनी शहरात राहू लागले.
मुरुगन स्वामींच्या आशीर्वादाने झाली संगीतमय प्रवासाची सुरुवात
एका दंतकथेनुसार असे म्हटले जाते की, दक्षिणेतील देवता मुरुगन स्वामी यांनी मुत्थुस्वामी यांच्या तोंडात खडीसाखरेचा तुकडा ठेवला आणि त्यांना गायला सांगितले. इथूनच त्यांच्या संगीतमय प्रवासाची सुरुवात झाली. आपल्या गावी परत जाण्याआधी मुत्थुस्वामी यांनी चिदंबरम, तिरुपती, कालहस्ती, कांची आणि तिरुवन्नामलई इत्यादी मंदिरांचे दर्शन घेण्यासाठी तीर्थयात्रेला निघाले. त्यांनी वीणा वादनातही प्रभुत्व मिळवले. त्यांनी रचलेल्या रचना प्रसिद्ध होत राहिल्या.
मुत्थुस्वामी दिक्षितर हे अट्टयपुरं येथे असताना यांना २१ ऑक्टोबर १८३५ साली देवाज्ञा झाली. त्यांच्या समर्थकांनी अट्टयपुरं येथे त्यांची समाधी बांधली. (Muthuswami Dikshitar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community