World Tuberculosis Day 2024: जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यामागचा हेतू काय आहे?

    क्षयरोग हा एक गंभीर आणि संसर्गजन्य रोग आहे

    279
    World Tuberculosis Day 2024: जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यामागचा हेतू काय आहे?
    World Tuberculosis Day 2024: जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यामागचा हेतू काय आहे?

    क्षयरोग हा एक गंभीर आणि संसर्गजन्य रोग आहे, जो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये सहज पसरतो. टीबीचा आजार प्रामुख्याने फुफ्फुसांवर होतो. पण टीबीचा आजार शरीराच्या इतर भागातही होऊ शकतो. टीबी हा क्षयरोगाच्या बॅक्टेरियामुळे होतो. जेव्हा संक्रमित व्यक्ती खोकते किंवा शिंकते तेव्हा या जीवाणूचे थेंब दुसर्‍या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतात.

    टीबीच्या लक्षणांमध्ये सामान्यत: कफ, रक्तस्त्राव, घसा खवखवणे, ताप आणि वजन कमी होणे यांचा समावेश आहे. उपचारासाठी टीबी रुग्णाला नियमित औषधोपचार, योग्य आहार आणि विश्रांतीची आवश्यकता असते. लक्षात असू द्या की दीर्घकाळ खोकला, वजन कमी होणे, खोकल्याबरोबर रक्त येणे, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे आदी टीबी आजाराची लक्षणे असू शकतात.

    (हेही वाचा – IPL 2024 Harshit Rana : केकेआरच्या हर्षित राणाला ‘ती’ चूक भोवली; बीसीसीआयने ठोठावला मोठा दंड)

    क्षयरोग हा एक प्राणघातक आजार आहे, ज्यामुळे जगभरात लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीत या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक क्षयरोग दिन (World Tuberculosis Day 2024) साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. जागतिक क्षयरोग दिन (World Tuberculosis Day 2024) दरवर्षी २४ मार्च रोजी जगभरात जागतिक आरोग्य संघटनेद्वारे पाळला जातो. डॉ. रॉबर्ट कोच यांनी २४ मार्च १८८२ रोजी मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस बॅसिलस हा टीबीचा जीवाणू शोधला होता. त्यामुळे दरवर्षी २४ मार्च रोजी जागतिक क्षय दिवस (World Tuberculosis Day 2024) पाळला केला जातो.

    वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने २०२४ च्या जागतिक क्षय दिवसाची थीम ठेवली आहे, ‘Yes! We can end TB.’ टीबी हा प्राणघातक आजार असला तरी आता टीबीवर मोठ्या प्रमाणात उपचार उपलब्ध आहेत. गेल्या वर्षी जागतिक टीबी दिनानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वन वर्ल्ड टीबी समिट’ला संबोधित करताना २०२५ पर्यंत भारत टीबीमुक्त करण्याचे वचन दिले होते. त्यामुळे आता टीबी हरेल आणि भारत जिंकेल. यासाठी आता सर्वसामान्य माणसांनी प्रयत्न करायला हवेत.

    हेही पहा –

    Join Our WhatsApp Community
    Get The Latest News!
    Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.