Adrian Albert D’Souza: ‘या’ खेळाडूने लहान वयात केली होती ऑलिम्पिकमध्ये हॉकी खेळाला सुरुवात

अभ्यासाबरोबरच एड्रीयन खेळातही हुशार होता. तो एक चांगला फुटबॉल खेळाडूही होता. वयाच्या सतराव्या वर्षीच त्याला नवी दिल्ली येथे असलेल्या एअर इंडिया हॉकी अकॅडमीमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी निवडलं गेलं.

171
Adrian Albert D'Souza: 'या' खेळाडूने लहान वयात केली होती ऑलिम्पिकमध्ये हॉकी खेळाला सुरुवात

एड्रीयन अल्बर्ट डिसुझा (Adrian Albert D’Souza) हा भारतीय हॉकी खेळाडू आहे. एड्रीयनचा जन्म २४ मार्च १९८४ साली महाराष्ट्रातील मुंबई येथे झाला. एड्रीयनने आपले दहावीपर्यंतचे शिक्षण मुंबईतील सेंट एनी स्कूल येथून घेतले. त्यानंतर बारावीपर्यंत तो खालसा कॉलेजमध्ये शिकला. मग मुंबईतल्याच रिझवी कॉलेजमधून समाजशास्त्र या विषयात आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. अभ्यासाबरोबरच एड्रीयन खेळातही हुशार होता. तो एक चांगला फुटबॉल खेळाडूही होता. वयाच्या सतराव्या वर्षीच त्याला नवी दिल्ली येथे असलेल्या एअर इंडिया हॉकी अकॅडमीमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी निवडलं गेलं.

एड्रीयन ९ वर्षांचा असताना पहिल्यांदा त्याची आणि हॉकीशी गाठ पडली. झालं असं की, एक दिवस त्याच्या शाळेच्या हॉकी टीममधल्या ठरलेल्या गोलकीपरने दांडी मारली. त्यावेळी एड्रीयन त्याच्या जागी खेळण्यासाठी तयार झाला आणि खूप चांगलं खेळलाही, पण मॅच संपेपर्यंत त्याचा दात तुटला होता. त्यावेळी त्याने कधीही गोलकीपिंग न करण्याचे ठरवले. पण त्याचे कोच त्याच्या खेळाने इतके प्रभावित झाले की काय सांगावे… त्यानंतर एड्रीयनने पुन्हा कधीही मागे वळून पाहिले नाही.

(हेही वाचा  – World Tuberculosis Day 2024: जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यामागचा हेतू काय आहे?)

भारताकडून १६५ आंतरराष्ट्रीय सामने
एड्रीयन हा वयाच्या विसाव्या वर्षी ऑलम्पिक खेळांमध्ये हॉकी खेळला. त्यावेळी ऑलिम्पिकमध्ये हॉकी खेळणाऱ्या खेळाडूंपैकी एड्रीयन हा सर्वांत लहान खेळाडू होता. एड्रीयन आपल्या देशासाठी आतापर्यंत हॉकीच्या १६५ आंतरराष्ट्रीय मॅच खेळला आहे. त्याने जानेवारी २००४ साली मलेशियातील क्वालालंपूर येथे भरवण्यात आलेल्या सुल्तान अझलान शाह हॉकी टुर्नमेंटमधून पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय हॉकी टीममधून भारताच्या वतीने पदार्पण केले होते. एड्रियन आतापर्यंत ऑलिम्पिक, वर्ल्डकप आणि आशियाई खेळांमध्ये भारताकडून १६५ आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.