स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनपटावरील ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ (Swatantra Veer Savarkar) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) यांनी या चित्रपटात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमिका अत्यंत ताकदीने साकारली आहे. असे असूनही फेसबूकवर या चित्रपटाच्या विरोधातील पोस्ट करून जाणीवपूर्वक नकारात्मकता निर्माण केली जात आहे. सोशल मीडियावरून वीर सावरकर चित्रपटाच्या कमाईवरून वाटेल ते बोलले जात आहे.
दिग्दर्शक आणि अभिनेता रणदीप हुड्डा याने या चित्रपटासाठी त्याचे घर विकले आहे. त्याविषयीही रणदीप हुड्डाची खिल्ली उडवली जात आहे. सावरकरप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांचा या चित्रपटाला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत असतांनाही या चित्रपटाला फारसा प्रतिसाद नसल्याचे चित्र उभे केले जात आहे. सावरकरद्वेषातून तथाकथित पुरोगामी मंडळी विरोधासाठी विरोध करत आहेत.
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: विजय शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार; अर्ज भरण्याची तारीख केली जाहीर)
‘सत्य’ समोर यावे – उदय निरगुडकर
ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर (Uday Nirgudkar) यांनी मात्र या चित्रपटाकडे कोणत्या दृष्टीने पहायला हवे, याविषयी सूचक पोस्ट केली आहे. निरगुडकर यांनी फेसबूकवर म्हटले आहे की, ‘रणदीप हुड्डा निर्मित सावरकर चित्रपट : ‘शोधक’ नजरेने पाहून ‘सत्य’ समोर यावे. मग तो किती चालला, यापेक्षा सत्य समोर आले याचे महत्त्व समजेल. आजही सावरकर या महानायकावर चित्रपट बनवला जातो, यातच सर्व काही आले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट
हा चित्रपट स्वातंत्र्यवीर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांच्या आयुष्यावर आधारित आहे. रणदीप हुड्डा याने वीर सावरकर यांची भूमिका साकारली आहे. त्याने या चित्रपटातून दिग्दर्शनात देखील पदार्पण केले आहे. या चित्रपटात अंकिता लोखंडेने यमुनाबाई म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.
सावरकरप्रेमींचे आवाहन
वीर सावरकर यांच्या भूमिकेसाठी रणदीपने त्याचे वजन ३० किलो कमी केले आहे. या चित्रपटाला आयएमबीडीवर 7. रेटिंग्स मिळाले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीचे हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये जाऊन पहावा. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा खरा इतिहास जाणून घ्यावा. ज्यांनी चित्रपट पाहिला आहे, त्यांनी इतरांना चित्रपट पहाण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन सावरकरप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांनी केले आहे. (Swatantra Veer Savarkar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community