Moon Lander Of Chandrayaan-3: चांद्रयान-३च्या लँडिंग साईटचे नाव ‘शिव शक्ती’; आयएयूची मंजुरी

129
Moon Lander Of Chandrayaan-3: चांद्रयान-३च्या लँडिंग साईटचे नाव 'शिव शक्ती'; आयएयूची मंजुरी

चांद्रयान-३ ज्या ठिकाणी उतरवण्यात आले त्या ठिकाणाला ‘शिव शक्ती’ हे नाव देण्यात आले. त्यामुळे आता यापुढे ही लँडिंग साईट या नावाने ओळखली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगळुरुमधील टेलिमेट्री ट्रेकिंग आणि कमांड नेटवर्क मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समधील शास्त्रज्ञांनी संबोधित करताना ही घोषणा केली. (Moon Lander Of Chandrayaan-3) आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघटनेने (International Astronomical Union) १९ मार्चला यासाठी मंजुरी दिली होती.

पंतप्रधान म्हणाले की, चांद्रयान-२ने ज्या स्थानावर आपले पदचिन्ह उमटवले आहेत. ते स्थानाला यापुढे ‘तिरंगा’ म्हटले जाईल. २३ ऑगस्टला भारताने चंद्रावर तिरंगा फलकवला होता त्या दिवस ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे, असे आवाहन केले आहे.

यावेळी शास्त्रज्ञांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, आज तुम्हा सर्वांमध्ये येऊन मला एक वेगळा आनंद होत आहे. कदाचित असा आनंद अतिशय दुर्मिळ प्रसंगी येतो, जेव्हा अशा घटना घडतात, तेव्हा अधीरता येते, यावेळी माझ्या बाबतीत तेच घडले आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: विजय शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार; अर्ज भरण्याची तारीख केली जाहीर)

जिथे कुणीच पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी आम्ही पोहोचलो आहोत. यापूर्वी जे कोणीही करून दाखवू शकले नाही, ते आम्ही केले आहे. २३ ऑगस्टचा त्या दिवसाचा प्रत्येक क्षण न् क्षण माझ्या डोळ्यांसमोर जसाच्या तसा दिसत आहे. चांद्रयान -३चे लॅंडिंग झाल्यानंतर देशभरात लोकांनी आनंदोत्सव साजरा केला. हा दिवस कोणीही विसरू शकणार नाही. काही प्रसंग अविस्मरणीय असतात. तसाच हा दिवस आहे. हा क्षण अमर झाला. चंद्रावर ज्या स्थानी आपले चांद्रयान उतरले त्या स्थानाला विशिष्ट नाव देण्याचा निर्णय भारताने घेतला. त्यामुळे चांद्रयान-३ जिथे उतरवण्यात आले, ती जागा आता ‘शिवशक्ती’ या नावाने ओळखली जाईल, असे मोदींनी आपल्या भाषणावेळी सांगितले.

कोणतेही अपयश अंतिम नसते…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले की, चंद्रावरील ज्या ठिकाणी चांद्रयान-२ ने आपल्या पावलांचे ठसे सोडले होते त्याला आता ‘तिरंगा’ असे नाव दिले जाईल. हा तिरंगा बिंदू भारताच्या प्रत्येक प्रयत्नासाठी प्रेरणादायी ठरेल, हा तिरंगा बिंदू आपल्याला शिकवेल की कोणतेही अपयश अंतिम नसते. “एक काळ असा होता जेव्हा आमची गणना तिसऱ्या रांगेत केली जात असे. आज व्यापारापासून तंत्रज्ञानापर्यंत भारताची गणना पहिल्या रांगेत उभे असलेल्या देशांमध्ये केली जात आहे. ‘तिसरी रांग’ पासून ‘पहिली रांग’ पर्यंतच्या या प्रवासात आपल्या ‘इस्रो’ सारख्या संस्थांनी खूप मोठी भूमिका बजावली आहे.

१ सप्टेंबरपासून चांद्रयानाविषयी प्रश्नमंजुषा स्पर्धा
यावेळी पंतप्रधानांनी देशातील तरुणांना आवाहन करून म्हटले आहे की, “भारताची वैज्ञानिक ज्ञानाची संपत्ती गुलामीच्या काळात लपलेली होती. स्वातंत्र्याच्या अमृतकाळात आपल्याला त्या खजिन्यावर संशोधन करून ती काढावी लागले. आजच्या आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाला आपल्याला आपल्या तरुण पिढीला नवीन आयाम द्यायचे आहेत. समुद्राच्या खोल भागापासून ते आकाशाच्या उंचीपर्यंत बरेच काही करायचे आहे. भारतात तरुणांसाठी सतत नव्या संधी खुल्या होत आहेत. अंतराळ क्षेत्रातही सरकार सातत्याने सुधारणा करत आहे. गेल्या ४ वर्षात अंतराळ क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्ट अप्सची संख्या ४ वरून १५० पर्यंत वाढली आहे. चांद्रयानाविषयी एक प्रश्नमंजुषा स्पर्धा १ सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.