जम्मू आणि काश्मीरमधून (Jammu-Kashmir) ३७० कलम हटवल्यानंतर तिथे महाराष्ट्र भवन (Maharashtra Bhavan) बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी जम्मू आणि काश्मीर सरकारने श्रीनगरच्या विमानतळानजीकच बडगाम येथे अडीच एकर जागा दिली आहे. मात्र आता जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी महाराष्ट्र भवन बांधण्याला विरोध केला आहे. यामुळे बडगाम येथे २.५ एकर जागेवर महाराष्ट्र भवनाच्या बांधकामाला विरोध केल्याबद्दल शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यामध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांचे छायाचित्र जाळून निषेध व्यक्त केला तसेच त्यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली.
एकनाथ शिंदे सरकारने पर्यटनाच्या दृष्टीकोनातून काश्मीरमधील भवन प्रस्तावित केले, जेणेकरून महाराष्ट्रातील लोक तेथे जाऊ शकतील आणि तेथे त्यांना मदत करता येईल, मात्र ओमर अब्दुल्ला यांनी याला विरोध केला आहे आणि म्हणूनच आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत, असे एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते राहुल लोंढे यांनी सांगितले.
(हेही वाचा – Celebrated Holi With Soldiers: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लेहमध्ये सैनिकांसोबत साजरी केली होळी, शुभेच्छा देताना म्हणाले…)
उद्धव ठाकरेंवरही टीका…
अलीकडेच महाराष्ट्र मंत्रिमंडळाने बडगाममधील भवनसाठी जमीन खरेदीला मंजुरी दिली. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी निषेधाबाबत सांगितले की, आवश्यकता भासल्यास शिंदे गटाचे कार्यकर्ते काश्मीरला जातील, असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे. विरोधी पक्षाच्या इंडिया गट आघाडीत ओमर अब्दुल्ला यांचे सहकारी असलेल्या उद्धव ठाकरे यांच्यावरही लोंढे यांनी टीका केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community