नागपूर ते मडगाव या कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या विशेष गाडीच्या फेऱ्यांना येत्या जूनअखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून विदर्भातून थेट कोकणात येणारी ही गाडी विशेष गाडी म्हणून चालवली जात आहे. (Nagpur-Madgaon Train)
नागपूर ते मडगाव ही विशेष गाडी (01139/01140) कोकण रेल्वे मार्गे चालवली जात आहे. या गाडीच्या आधी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ३१ मार्चपर्यंत चालणार होत्या. मात्र आता या गाडीच्या फेऱ्यांचा विस्तार करून ती जूनअखेरपर्यंत सुरू राहणार आहे. या संदर्भात कोकण रेल्वे दिलेल्या माहितीनुसार, नागपूर ते मडगाव या मार्गावर बुधवार आणि शनिवार अशी दोन दिवस ही गाडी (01139) धावते, तर मडगाव जंक्शन ते नागपूर या प्रवासासाठी ही विशेष गाडी (01140) दर गुरुवार आणि रविवारी प्रवासाला निघते.
(हेही वाचा – Mahadev Jankar : महादेव जानकर महायुतीतच रहाणार; मतदारसंघाची घोषणा लवकरच)
ही गाडी वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, थिवी आणि करमळी स्थानकावर थांबते. ही विशेष गाडी एकूण २४ डब्यांची आहे. त्यात टू टायर एसी १, , थ्री टायर एसी ५, स्लीपर ११, सेकंड सीटिंग ५ तर एसएलआर २ डबे अशी या गाडीची रचना आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community