अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या भाजपाच्या लोकसभा उमेदवारांच्या यादीत १११ पैकी महाराष्ट्रातील केवळ तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली. त्यात दोन विद्यमान खासदार असून एका आमदाराला संधी देण्यात आली आहे.
दोन विद्यमान खासदार
गोंदिया-भंडारा या मतदारसंघातून विद्यमान खासदार सुनील मेंढे तर गडचिरोली-चिमूर येथूनही खासदार अशोक नेते यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. गडचिरोली-चिमूर मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. मेंढे यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाना पंचबुद्धे यांचा १.८९ लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता, तर नेते यांनी काँग्रेसचे नामदेव उसंडी यांना ७६,००० पेक्षा अधिक मतांनी पराभूत केले होते. या दोन्ही मतदारसंघांत राज्यातील पहिल्या टप्प्यात म्हणजेच १९ एप्रिलला मतदान होणार आहे.
(हेही वाचा – IIT Student ISIS : आयआयटीचा विद्यार्थी तौसिफ अल फारूकी ISIS च्या संपर्कात; वसतीगृहात सापडला इसिसचा झेंडा)
दोन आमदारांची लढत
सोलापूर मतदारसंघावर राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेसने दावा केला होता, मात्र भाजपाने या ठिकाणी विद्यमान आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर केली आणि वाद मिटला. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. सातपुते यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवार आणि विद्यमान आमदार काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, अशी थेट लढत होणार असून एक आमदार लोकसभेत नक्की जाणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. या मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच ७ मेला मतदान होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community