स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अंदमानातील ज्या कोठडीत ठेवले होते, त्या कोठडीत मी गेलो होतो, तर माझा श्वास कोंडला. मी ५ मिनिटेही तिथे राहू शकलो नाही. अंदमानात ज्या ठिकाणी सर्व कैद्यांना फाशी दिली जात असे, त्याच खोलीसमोर स्वातंत्र्यवीर सावरकरांची कोठडी होती. ब्रिटिशांनी केलेले अन्याय आपण अंदमानातील त्या कोठडीत जाऊन अनुभवू शकतो. ते अंदमानातील सेल्युलर कारागृह (Cellular Jail) तोडण्याचा प्रयत्न नेहरू सरकारच्या काळात झाला, अशी वेदना ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ (Swatantra Veer Savarkar) चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेते रणदीप हुड्डा (Randeep Hooda) याने व्यक्त केली. तो सुदर्शन वाहिनीवर (Sudarshan Vahini) मुख्य संपादक सुरेश चव्हाणके (Suresh Chavanke) यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होता.
प्रदर्शनापूर्वीच झाला विरोध
चित्रपट बनवताना आलेल्या अडचणी, त्याच्या प्रदर्शनाला होत असलेला विरोध याविषयीही हुड्डा याने यावेळी सांगितले. या मुलाखतीच्या वेळी बोलताना रणदीप हुड्डा पुढे म्हणाला की, चित्रपट २२ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. त्याआधी २१ मार्चपासूनच चित्रपटाच्या विरोधात मोहीम चालू केली आहे. उलट-सुलट गोष्टी सांगितल्या जात आहेत. मी जेव्हा या चित्रपटासाठी काम चालू केले, तेव्हापासून मला सांगितले जात होते की, अशा भूमिकेने तुझ्यातील कलाकारावर परिणाम होईल. मला त्याने काही फरक पडला नाही. उलट मी चित्रपटाचे लिखाण करताना मला वाटत होते की, सावरकर मला सुचवत आहेत की, हे लिही, ते लिही. इतका तो अद्भूत अनुभव होता. (Swatantra Veer Savarkar)
Join Our WhatsApp Community