लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) धामधूम सुरु झाली आहे. भाजपाने त्यांची महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली मात्र अद्याप शिंदे गटाने आणि अजित पवार गटाने त्यांची उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना मंगळवार, २६ मार्च रोजी शिवसेनेची उमेदवारांची पहिली यादी जाहीर करेल, असे सांगितले. तर दुसरीकडे उबाठाचे नेते संजय राऊत यांनीही त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी मंगळवारीच जाहीर होईल, असे म्हटले.
शिंदे गटाकडून रामटेकमधून राजू पारवे, वाशिम-यवतमाळमधून संजय राठोड यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे. तर मावळमध्ये श्रीरंग बारणे आणि कोल्हापूरातून संजय मंडलिक यांनाच उमेदवारी देण्यात येईल असे बोलले जात आहे. दुसरीकडे उबाठा गटानेही उमेदवार निश्चित केले आहेत. त्यांचीही (Lok Sabha Election 2024) पहिली यादी मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे राज्यात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रंगात खऱ्या अर्थाने मंगळवारपासून सुरु होणार आहे.
Join Our WhatsApp Community