Rohit Sharma Frustrated : मुंबईच्या पराभवाने व्यथित झालेला रोहित शर्मा हार्दिक पांड्याशी काय चर्चा करत होता

Rohit Sharma Frustrated : सलामीच्या सामन्यात मुंबईला चांगल्या सुरुवातीनंतरही पराभव पत्करावा लागला. 

203
IPL Mega Auction : मुंबई इंडियन्स रोहित शर्माला डच्चू देणार?
  • ऋजुता लुकतुके

मुंबई इंडियन्स फ्रँचाईजीने हंगामातील पहिला सामना हरणं ही त्यांच्या आयपीएल मोहिमेतील परंपरा आहे. तोच निकाल रविवारी गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात अहमदाबादमध्ये बघायला मिळाला. यावेळचा पराभव निसटता आणि चांगल्या सुरुवातीनंतर अनपेक्षितपणे झालेला होता. १६८ धावांचा पाठलाग करताना ३ बाद १२९ अशा सुस्थितीत मुंबईचा संघ होता. पण, तिथून विकेट पडत गेल्या आणि मुंबईचा पराभव झाला. (Rohit Sharma Frustrated)

या हंगामापासून एका मोठा बदल फ्रँचाईजीत झालाय तो नेतृत्वाचा. रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पांड्या संघाचं नेतृत्व करतोय. आणि त्याच्या नेतृत्वाखाली हा मुंबईचा पहिला सामना होता. या सामन्यात हार्दिकने मुख़्य गोलंदाज जसप्रीत बुमराला सुरुवातीलाच गोलंदाजीला का आणलं नाही, यावरुनही तज्ज्ञांनी सवाल उभे केले होते. पुढे जसप्रीत आल्यावर त्याने झटपट ३ विकेट घेतल्या आणि गुजरात डावाला खिंडार पडलं. दुसरीकडे गुजरात संघाचा कर्णधारही नवखाच होता. पण, दडपणाखाली शुभमन गिलने संघाला मार्ग दाखवला. (Rohit Sharma Frustrated)

(हेही वाचा – Fastest Balls in IPL : उमरान मलिक की शॉन टेट? आयपीएलमधील सगळ्यात वेगवान गोलंदाज कुठला?)

मुंबईचे खेळाडू या निसटत्या पराभवामुळे थोडे निराश दिसले. आणि यात सर्वाधिक बोलका चेहरा रोहित शर्माचा होता. सामना संपल्यानंतर तो कर्णधार हार्दिक पांड्याबरोबर बराच काळ चर्चा करताना दिसला. तेव्हा फ्रँचाईजीचे मालक आकाश अंबानीही तिथे होते. सामन्या दरम्यानही रोहित हार्दिक आणि इतर खेळाडूंना वेळोवेळी सूचना करत होता. संघाच्या रणनीतीचाच तो भाग असावा. (Rohit Sharma Frustrated)

(हेही वाचा – Holi In Kashi Ayodhya : होळीच्या रंगात रंगली काशीनगरी; अयोध्येत यंदा ५०० वर्षांनी साजरा झाला सण)

सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या फिरतो आहे. अजूनही मुंबई इंडियन्सचे काही चाहते रोहितला कप्तानीवरून हटवल्यामुळे नाराज आहेत. पहिल्या पराभवानंतर नवीन कर्णधार हार्दिक पांड्या मात्र शांत आहे. ‘ही लीगची सुरुवात आहे. अजून आम्हाला १३ साखळी सामने खेळायचे आहेत. अर्थात, शेवटच्या पाच षटकांत ४० धावा करताना आमची दमछाक झाली. ती होऊ नये याचा विचार आम्ही करणार आहोत,’ असं हार्दिकने सांगितलं. (Rohit Sharma Frustrated)

अर्थात, मुंबईसाठी ही सुरुवात आहे. आणि अजून ९० टक्के लीग बाकी आहे याची कल्पना चाहत्यांनाही आहे. आता मुंबईचा दुसरा सामना २७ मार्चला सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध हैद्राबादला होणार आहे. (Rohit Sharma Frustrated)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.