सोलापूर लोकसभा मतदार (Lok Sabha Election 2024) संघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना भाजपाचे राम सातपुते यांचे आव्हान असणार आहे. या दोघांमध्ये लेटर वॉर सुरु झाले आहे. प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना उद्देशून पत्र लिहिले ज्यात त्यांनी ‘समाजात फूट न पाडता एकत्रित समाजाच्या विकासासाठी काय करू शकतो, यावर निवडणूक लढू, असे म्हटले. त्याला राम सातपुते त्यांनी पत्रानेच उत्तर दिले.
काय म्हटले सातपुते यांनी पत्रात?
मी २०१९ पासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतो आहे. मी आमदार झाल्यापासून आजतोवर मी माझ्या मतदारसंघातील (Lok Sabha Election 2024) जनतेच्या आणि त्यायोगे सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत माझ्या परिने प्रामाणिकपणे होईल तेवढी विकासकामे 8प्रयत्न केलाय. मी ज्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, तिथे आम्ही समाजाला एकसंध ठेवण्यासाठी मा. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सबका साथ सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या मंत्राला सार्थ ठरवत समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी झटत आहोत. समाजात धर्म, जातीपातीत फूट पाडून कुणी एवढी वर्षे राजकारण केलंय, हे सोलापूरच्याच नव्हे तर पूर्ण देशाच्या जनतेने आता चांगलंच ओळखलं आहे. राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या एका ऊसतोड कामागराच्या कुटुंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भाजपाने जो विश्वास दाखवला आहे, त्याला सोलापूरचा सर्वांगिण विकास करुन सार्थ ठरवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. वंदे मातरम’, असे राम सातपुते म्हणाले.
Join Our WhatsApp Community